अबू धाबीमध्ये गणेशोत्सवाचा थाट!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 03:47 PM2017-08-31T15:47:18+5:302017-08-31T15:51:07+5:30

महाराष्ट्र मंडळ अबु धाबी यांच्यावतीने अबू धाबीतील मराठी भाषिक भारतीय कुटुंबीय मिळून दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतात.

गणेशोत्सवा दरम्यान या मंडळाकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. यंदाही खास कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

महाराष्ट्र मंडळ अबू धाबी या मंडळाच्या गणेशोत्सवाचा यंदा चाळीसाव्वा वर्धापन दिन होता.

तरुण पिढीमध्ये सांस्कृतिक मुल्यं आणि नैतिकता टिकवून ठेवणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हाच महाराष्ट्र मंडळ अबु धाबीचा उद्देश आहे.