Ganesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 07:23 PM2018-09-23T19:23:26+5:302018-09-23T19:59:16+5:30

‘मानाचा गणपती’ : कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ मंगळवारपेठेतील श्री. तुकाराम माळी तालीम मंडळाच्या ‘मानाच्या गणपती’ पूजनाने रविवारी सकाळी करण्यात आला. ( छाया : आदित्य वेल्हाळ)

‘बाप्पां’वर फुलांची उधळण : या मिरवणुुकीत लहान मुलांनी ‘बाप्पां’च्या मूर्तीवर अशी फुलांची उधळण केली. ( छाया : आदित्य वेल्हाळ)

कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत महापौर शोभा बोन्द्रे यांनीही फुगडीचा फेर धरला . ( छाया : आदित्य वेल्हाळ)

‘मानाचा गणपती’ : कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत महापौर शोभा बोन्द्रे यांनी ‘मानाच्या गणपती’च्या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या. ( छाया : आदित्य वेल्हाळ)

आकर्षण ठरली ‘लंडन बस’ : या मिरवणुुकीत श्री. तुकाराम माळी तालीम मंडळाने ‘बाप्पा निघाले लंडन’ला संकल्पनेवर आधारित ‘लंडन बस’ सहभागी केली. ही बस लहान मुलांचे आकर्षण ठरली. ( छाया : आदित्य वेल्हाळ)

‘लेटेस्ट’ चा साधेपणा : मंगळवारपेठेतील लेटेस्ट तरूण मंडळाने यावर्षी पालखीतून गणेश मूर्ती नेत साध्या पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढली. ( छाया : आदित्य वेल्हाळ)

‘प्लॅस्टिक बंदी’ : मिरवणुकीत डी. डी. जाधव ग्रुपने प्लॅस्टिक बंदीबाबतचा देखावा सादर केला. ( छाया : आदित्य वेल्हाळ)

कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत नऊवारी साडी आणि फेटे परिधान केलेल्या महिला लेझीम खेळत सहभागी झाल्या. ( छाया : आदित्य वेल्हाळ)

ढोल वादनाने रंगत : मिरवणुकीत विविध ढोल वादन पथकांनी सादरीकरण करून रंगत आणली.( छाया : आदित्य वेल्हाळ)

कार्यकर्त्यांच्या हातांची पालखी : मिरवणुकीत एका मंडळाने ट्रॅक्टर, वाहनांच्या वापराला बगल दिली. या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ‘बाप्पां’साठी अशी हातांची पालखी केली. ( छाया : आदित्य वेल्हाळ)

स्पर्धा करू विधायक कामाची : विद्यार्थी कामगार मंडळाने मिरवणुकीत विधायक गणराया हा देखावा सादर केला. त्यातून ‘ईर्ष्या नको मोठा डॉल्बी लावण्याची, स्पर्धा करूया विधायक काम करण्याची’असा संदेश त्यांनी दिला. ( छाया : आदित्य वेल्हाळ)

गणेशभक्तांनी मार्ग फुलला : या मिरवणुकीच्या माध्यमातून ‘बाप्पां’ची विविध रूपे आणि मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केल्याने पापाची तिकटी ते गंगावेश पर्यंतचा मार्ग फुलला होता.( छाया : आदित्य वेल्हाळ)

‘बाप्पांना’ निरोप : गेल्या दहा दिवसांपासून उत्साही वातावरणात आपल्या लाडक्या गणरायाचा उत्सव साजरा करणारे गणेशभक्त, मंडळांच्या कार्यकर्त्यांनी भक्तीपूर्ण वातावरणात ‘बाप्पांना’ निरोप दिला. ( छाया : आदित्य वेल्हाळ)

ढोल वादनाने रंगत : मिरवणुकीत विविध ढोल वादन पथकांनी सादरीकरण करून रंगत आणली.( छाया : आदित्य वेल्हाळ)

कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत आबालथोरांनी जल्लोष करत मिरवणुकीचा आनंद लुटला . ( छाया : आदित्य वेल्हाळ)

कानठळ्या बसवणाऱ्या वाद्यांना फाटा देत अनेक गणेश मंडळांनी कोल्हापुरात पारंपरिक वाद्यांना प्राध्यान्य दिले ( छाया : आदित्य वेल्हाळ)

नदीघाट परिसरात स्वच्छता मोहिम : पंचगंगा नदी घाट परिसरात शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थींनींनी स्वच्छता मोहिम राबवली.