कोल्हापूरात विजयोत्सव! 'भाजपाच्या पैलवाना'चा राज्यसभेच्या आखाड्यात शिवसेनेला धोबीपछाड!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 08:44 PM2022-06-12T20:44:44+5:302022-06-12T21:08:30+5:30

भाजपाच्या धनंजय महाडिकांचा शिवसेनेच्या संजय पवारांवर विजय

BJP Historical Victory Rally Rajya Sabha Elections 2022, Dhananjay Mahadik Chandrakant Patil: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यात भाजपाने शिवसेनेचा एका जागेवर पराभव केला.

पाच जागांवर भाजपाचे २ तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा १-१ उमेदवार बिनविरोध निवडून आला. पण निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेच्या संजय पवारांना पराभूत करून भाजपाच्या धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला.

भाजपाच्या या ऐतिहासिक विजयानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विजयी उमेदवार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरात भव्य विजयी रॅली काढली.

सहाव्या जागेसाठी शिवसेनेने कोल्हापूरातून संजय पवार यांनी उमेदवारी दिली होती. त्यास लढत म्हणून भाजपानेही कोल्हापूरच्या धनंजय महाडिकांना मैदानात उतरवले.

धनंजय महाडिकांच्या विजयाने कोल्हापूर महाडिक कुटुंबाचे राजकीय वजन वाढलेच. पण त्यासोबतच मूळचे कोल्हापूरचे असलेले प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाही आनंद गगनात मावत नव्हता.

राज्यसभेच्या जागेसाठी विजय मिळवल्यानंतर भाजपाच्या धनंजय महाडिकांनी आज भव्य रॅली काढत विजयोत्सव साजरा केला.

विजयोत्सवाच्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने भाजपाच्या कार्यकर्ते पाहायला मिळाले.

चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या विजयानंतर भव्य रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचे आभार मानले.

'महाडिक यांचा परत नाद कराल का?' अशा आशयाचे काही छोटे फलकही कार्यकर्त्यांच्या हाती दिसून आले.

भाजपा कार्यकर्त्यांना या विजयोत्सवात विजयाचा गुलाल उधळत जल्लोष केला.