'बकासुराचा वाडा' पाहिलाय का?; कोल्हापूर-सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर या गुहेजवळच झालं होतं भीम-बकासुराचं युद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 12:23 PM2022-02-08T12:23:05+5:302022-02-08T12:37:21+5:30

आदित्य वेल्हाळ : कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर व समुद्रसपाटीपासून १५०० मीटर उंचीवर व ३५० फूट खोल दरीत असलेली ऐनारी गुहा ही 'बकासुराचा वाडा' म्हणून प्रचलित आहे. ऐनारी गावाच्या नावावरून या गुहेला ऐनारी नाव पडले असले तरी हाच तो बकासुराचा प्रदेश जेथे भीमाने बकासुराला मारले, असे लोककथांमध्ये सांगितले जाते. या गुहेच्या पायथ्याशी राकसवाडा आहे. काही खाबांची पडझड वगळता आजही हा वाडा सुस्थितीत आहे.. पहा या वाड्याचे खास फोटो

या गुहेचे अंतगृह वैशिष्ट्यपूर्ण आहे. आत शयनगृह, पाण्याचे कुंड आहे

वाड्यात आहे १२ खांबांचे सभागृह

गुहेच्या मध्यभागी आहे शयनगृह

प्रवेशद्वारातून सभामंडपात जाताना आहे ही दगडी कमान

प्रत्येक खांब १२ ते १४ फूट उंचीचा व दाेन खांबांत १० फुटांचे आहे अंतर

रोपच्या साह्याने जावे लागते दरीतून. वाड्यातील काही खांब आता कोसळले आहेत

ही गुहा सुमारे आठ हजार वर्षांपूर्वीची असावी, असा कयास आहे