जगातलं सर्वात महागड स्वेटर पाहिलं का? किंमत ऐकुनच अंगात भरेल हुडहुडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 05:31 PM2021-12-09T17:31:20+5:302021-12-09T18:03:58+5:30

एखाद्या स्वेटरची किंमत किती अस शकेल, असं तुम्हाला वाटतं? सध्या असा एका स्वेटर बाजारात विक्रीसाठी आला आहे, जो जगातील सर्वात महागडा स्वेटर मानला जात आहे.

थंडीपासून बचाव करणारा आणि स्टाईल आयकॉन (Style Icon) असणारा ३० लाख रुपये किंमतीचा स्वेटर (Sweater worth 30 lakh) सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.

सध्या ख्रिसमसच्या तोंडावर बाजारात असा एक स्वेटर आलाय, ज्याची किंमत ऐकून कुणालाही धक्का बसेल. या स्वेटरची किंमत ठेवण्यात आली आहे ३० हजार युरो म्हणजेच (Costliest sweater) भारतीय चलनात ३० लाख रुपये. काय आहे खासियत

हा स्वेटर एका खास प्रकाराने आणि खास उद्दिष्टासाठी तयार कऱण्यात आला आहे. या स्वेटरवर जगातील अनेक महागडी रत्नं लावण्यात आली आहेत.

प्रचंड मेहनत यासाठी करण्यात आली आहे. सध्या या स्वेटरचे निर्माते यासाठी कोण खरेदीदार येतो, त्याची वाट पाहत आहेत.

30 लाख रुपये किंमत असलेला हा स्वेटर तयार करण्यासाठी ३ हजार तास खर्च झाले आहेत. एडेन लिबन या कलाकारानं हा स्वेटर विणला आहे.

33 वर्षांच्या एडेननं त्याच्या आयुष्यातील आतापर्यंतची सर्व पुंजी हा स्वेटर तयार करण्यात खर्च केली आहे. या जंपरसाठी त्याने तब्बल 7 लाख रुपये खर्च केले आहेत.

या जंपरमध्ये एका रेडिएटरदेखील बसवण्यात आला आहे. २४ कॅरेट सोन्याच्या इटालियन सिल्कपासून हा स्वेटर विणण्यात आला आहे.

यापूर्वीदेखील असाच एक स्वेटर तयार करण्यात आला होता, ज्याची किंमत होती २५ लाख रुपये. त्यानंतर आता हा ३० लाख रुपये किंमतीचा स्वेटर तयार करण्यात आला आहे.

आतापर्यंतचा जगातील हा सर्वात महाग स्वेटर मानला जात आहे. या स्वेटरच्या विक्रीतून येणारी रक्कम राष्ट्रीय आरोग्य निधीत दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

प्रत्येकाला स्टाईलीश राहायला आवडतं. वेगवेगळ्या ऋतुंमध्ये वेगवेगळे (Fashion and season) आणि गरजेप्रमाणं कपड्यांचा वापर केला जातो. मात्र आपले कपडे हे आपल्या पर्सनॅलिटीसाठी (Personality) उठून दिसतील आणि चारचौघात लक्षवेधी ठरतील, अशी बहुतेकांची अपेक्षा असते.