बाबो! 18 बॉयफ्रेंड्स एकाचवेळी हॅंडल करत होती ही महिला, सगळ्यांनाच खोटं बोलून लावला चूना...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 11:29 AM2023-02-25T11:29:21+5:302023-02-25T11:38:12+5:30

महिलेचं डेली रूटीन इतकं जबरदस्त होतं की, ती सगळ्यांना सहज हॅंडल करत होती. या तरूणांना महिलेवर पूर्ण विश्वास होता की, ती त्यांच्यासोबत लग्न करेल.

चीनच्या एक विवाहित महिला आपलं लक्झरी लाइफ जगण्यासाठी 18 बॉयफ्रेंड्सना एकाचवेळी डेट करत होती. सगळ्यांशी खोटं बोलून त्यांच्याकडून पैसे घेत होती. इतकंच नाही तर तिने सगळ्यांना लग्न करण्याचं आश्वासनही दिलं होतं. महिलेने या तरूणांसोबत खोटं बोलून तब्बल 3 लाख अमेरिकन डॉलर जमा केले.

महिलेचं डेली रूटीन इतकं जबरदस्त होतं की, ती सगळ्यांना सहज हॅंडल करत होती. या तरूणांना महिलेवर पूर्ण विश्वास होता की, ती त्यांच्यासोबत लग्न करेल. त्यामुळे ती जेव्हाही पैसे मागत होती ते लगेच देत होते. तिला पैसे देण्यासाठी तर एका तरूणाने आपलं घर विकलं होतं.

साउथ चीन मॉर्निंग पोस्टनुसार, या महिलेचं नाव वू आहे. महिला एक फॅशन मॉडल आहे. तिचा भांडाफोड तेव्हा झाला जेव्हा काही तरूणांनी तिला लग्नासाठी नोंदणी करण्याची मागणी केली. त्यांना टाळण्यासाठी ती वेगवेगळी कारणे देत होती.

तरूणांना संशय आला तेव्हा तिचा भांडाफोड झाला. शांघाय पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, तिने 2017 पासून बॉयफ्रेंड्स बनवणं सुरू केलं होतं. 2014 मध्ये तिने जेंग नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं होतं. त्याना एक दोन वर्षांचा मुलगाही आहे.

वडिलांची कॅंसर ट्रीटमेंट, चुलत भावाला तुरूंगातून सोडवणं आणि भावाचं लग्नासाठी फ्लॅट खरेदी करणं अशी तीन खोटी कारणं देत तिने तरूणांकडून पैसे घेतले होते. यातील ती सगळ्यात जास्त वडिलांच्या उपचाराचं कारण सांगत होती. पण तिच्या वडिलांना काहीच झालं नव्हतं.

शेवटी काही तरूणांना संशय आला तर त्यांनी पैसे परत मागितले. ती देऊ शकली नाही तर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. तेव्हा काही तरूणांना पैसे परत देण्यासाठी दुसऱ्या तरूणांकडे तिने मागणं सुरू केलं.

महिलेने बॉयफ्रेंड ली कडून इमरजन्सी असल्याचं सांगत पैसे मागितले होते. या तरूणाने तिला मदतीसाठी आपलं घर विकलं. त्याला वाटलं होतं की, पैसे परत मिळतील. पण ही बाब तिच्या दुसऱ्या बॉयफ्रेंडला समजली.

कारण महिलेने दुसरा बॉयफ्रेंड वांगकडे रिक्वेस्ट केली होती की, त्याने तिचा भाऊ बनून ली याला समजाऊन सांगावं. महिलेने वांगला सांगितलं की, त्याचा टॅक्स न दिल्याने ली तिचा पाठलाग करत आहे. तेव्हाच वांगला संशय आला. ली ने महिलेला 150,000 अमेरिकी डॉलर उधार दिले होते.

महिलेचा भांडाफोड झाल्यावर तिच्या बॉयफ्रेंडने पोलिसात तक्रार दाखल केली. जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तर महिलेने ती अविवाहित असल्याचा दावा केला. पोलीस पुढील चौकशी करत आहे.