रशियाचे राष्ट्रपती पुतिन खरंच रक्तानं आंघोळ करतात? रिपोर्टमध्ये करण्यात आला धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 07:45 PM2022-04-04T19:45:05+5:302022-04-04T19:54:46+5:30

युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमिर झेलेन्स्की असोत अथवा रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन असोत, दोन्ही नेत्यांसंदर्भात आश्चर्यचकित करणाऱ्या अनेक गोष्टी समोर येत आहेत.

रशिया आणि युक्रेन युद्धामुळे दोन्ही देशांच्या नेत्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमिर झेलेन्स्की असोत अथवा रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन असोत, दोन्ही नेत्यांसंदर्भात आश्चर्यचकित करणाऱ्या अनेक गोष्टी समोर येत आहेत. कदाचित हे जाणून आपल्याला आश्चर्य वाटेल, की राष्ट्रपती पुतिन हे हरणाच्या रक्ताने आंघोळ करतात!

हरणाच्या शिंगातून निघालेल्या रक्ताने आंघोळ करता पुतिन - रशियाचे राष्ट्रपती पुतिन हे अत्यंत कठोर मनाचे नेते आहेत, असे अनेक लोक म्हणतात. त्यांची आंघोळ करण्याची पद्धतही वेगळी आहे. राष्ट्रपती पुतिन हे हरणाच्या शिंगांतून (Deer Antlers) आलेल्या रक्ताने आंघोळ करतात. एका रिपोर्टनुसार पुतिन यांनी कॅन्सर स्पेशालिस्टसोबत अनेकदा प्रवास केला आहे.

रिपोर्टमध्ये करण्यात आलाय दावा - 'द इंडिपेंडंट'ने दिलेल्या एका वृत्तानुसार, एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे, की पुतिन हरणाच्या शिंगांमधून निघणाऱ्या अर्कापासून आंघोळ करतात. असेही म्हटले जाते, की याने पुतीन यांची शारिरीक शक्ती वाढते. एवढेच नाही, तर प्रत्येक ठिकाणी एका कॅन्सर स्पेशलिस्ट (Cancer Specialist) त्यांच्या सोबत असतो, असेही या वृत्तात म्हणण्यात आले आहे.

आरोग्याच्या दृष्टीने अधिक सतर्क - रशिया-युक्रेन युद्ध काळात तर पुतिन त्यांच्या प्रकृतीसंदर्भात अधिकच सतर्क आहेत. याच रिपोर्टनुसार पुतिन मॉस्कोतील सेंट्रल क्लिनिकल हॉस्पिटलमधील डॉक्टरांसोबत प्रवास करत आहेत.

डॉक्टरांच्या टीममध्ये कॅन्सर तज्ज्ञ इव्हगेनी सेलिव्हानोव्ह यांचाही समावेश आहे. सेलिवानोव्ह यांनी पुतिन यांच्यासोबत 35 वेळा प्रवास केला आहे.

पुतिन अशा पद्धतीने का करतात आंघोळ? - रिपोर्टमध्ये एका सूत्राच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे, की पुतिन आरोग्याच्या (Health) दृष्टीने अत्यंत कठीन काळातून जात आहेत. रशियन राष्ट्रपती हरणाच्या शिंगातील रक्ताचा वापर करत असल्याने Antler Bath रशियात अत्यंत प्रसिद्ध झाले आहे.

असे मानले जाते, की हरणाच्या शिंगांचे रक्त कार्डियोव्हॅस्क्युलर सिस्टिम आणि स्किनला पुनरुज्जीवित करते. राष्ट्रपती पुतिन यांच्याशिवाय रशियातील अनेक दिग्गज लोक अशा पद्धतीने आंघोळ करतात.