Rishi Sunak Net worth: ऋषी सुनक यांची संपत्ती किती? ब्रिटनच्या राजालाही लाजवेल असा मॅन्शन... एवढ्या एकरात पसरलाय..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 01:31 PM2022-10-25T13:31:51+5:302022-10-25T13:36:17+5:30

Rishi Sunak Net worth: ब्रिटिशांनी कधी स्वप्नातही पाहिले नसेल, कोणाच्या ध्यानीमनी होते, एक दिवस असा येईल की भारताचा सूपूत्र ब्रिटिशांचा पंतप्रधान होईल...

कोणे एके काळी भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. त्यांनी एकेक करून राजा-महाराजांना आपल्या ताकदीच्या जोरावर आपले गुलाम बनविले. जे नाही बनले ते निकराने लढले. साधारण दोन शतके त्यांनी भारतावर राज्य केले. ७५ वर्षांपूर्वी ते भारत सोडून निघून गेले. आज याच ७५ वर्षांत काळाने अशी काही चक्रे फिरविली की, एक भारतीय व्यक्ती त्याच ब्रिटिशांच्या देशावर राज्य करणार आहे. ऋषी सुनक यांनी ही किमया करून दाखविली आहे. कोणाच्या ध्यानीमनी होते, एक दिवस असा येईल की भारताचा सूपूत्र ब्रिटिशांचा पंतप्रधान होईल...

अनिवासी भारतीय असलेले सुनक आजच ब्रिटनच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतील. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून केली होती. त्यांनी ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी आणि अमेरिकेच्या स्टैनफोर्ड यूनिवर्सिटीतून शिक्षण घेतले आहे. सुनक यांच्याकडे एवढी संपत्ती आहे की त्यापुढे ब्रिटनचा राजा फिका पडेल. सुनक यांची पत्नी देखील अब्जाधीश आहे.

दी संडे टाईम्सने ब्रिटनच्या श्रीमंतांची यादी जाहीर केली होती. यानुसार सुनक आणि त्यांच्या पत्नीची संपत्ती 730 मिलियन पाउंड एवढी आहे. अडीचशे श्रीमंतांच्या यादीत सुनक यांचा क्रमांक २२२ वा लागतो. सुनक आणि त्यांची पत्नी अक्षताच्या नावावर चार मोठमोठाली घरे आहेत. दोन घरे लंडनमध्ये आणि एक यॉर्कशायरमध्ये आणि एक अमेरिकेच्या लॉस अँजेलिसमध्ये आहे.

लंडनमध्ये त्यांचे जे एक घर आहे त्याची किंमतच 7 मिलियन पाउंड आहे. यार्कशायरमध्ये जे घर आहे त्याची जमीन १२ एकर आहे. कॅलिफोर्नियामध्ये त्यांचे एक पेंटहाऊस देखील आहे. या घरात हॉलीवुडची फिल्म बेवॉच (Baywatch) ची शुटिंग झाली होती. ही तीच फिल्म ज्यात ड्वेन जॉनसन (Dwayne Johnson) सोबत प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) काम केले होते.

ऋषी सुनक यांची पत्नी अक्षता मूर्ती या दिवंगत क्वीन एलिझाबेथ यांच्यापेक्षाही श्रीमंत होत्या. अक्षता यांच्याकडे इन्फोसिसचे लाखो शेअर्स आहेत. अक्षता यांची संपत्ती 430 मिलीयन पाउंड आहे, तर Queen Elizabeth II ची संपत्ती 350 मिलीयन पाउंड होती. यूकेचे खासदार आणि चांसलर म्हणून सुनक यांचा पगार £1,51,649 आहे. पंतप्रधान झाल्यानंतर त्यात आणखी वाढ होईल.

ऋषी सुनक हे एक इन्व्हेस्टमेंट बँकर देखील होते आणि एकेकाळी गोल्डमन सॅक्सशी विश्लेषक म्हणून संबंधित होते. अक्षताची इन्फोसिसमध्ये ०.९३ टक्के हिस्सेदारी होती. यामुळे सुनक याची संपत्ती अचानक वाढली. सुनक 2015 मध्ये रिचमंड, यॉर्कशायर येथून खासदार झाले. त्यांनी भगवद्गीतेवर खासदार म्हणून शपथ घेतली. त्यांना दारुचे व्यसन नाही.