पुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 12:44 PM2018-09-24T12:44:34+5:302018-09-24T12:50:30+5:30

आपण नेहमीच ऐकतो की, जेवण करण्याआधी आपण हात स्वच्छ धुतले पाहिजे. तसेच बाहेरून आल्यावर, टॉयलेटमधूर येताना हात स्वच्छ केले पाहिजे असे सांगतात. कदाचित तुम्हीही हा सल्ला इतरांना देत असाल. पण U.S च्या डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशन सेंटरनुसार, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हात स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. पण तुम्हाला हे वाचून धक्का बसेल की, प्रमाणापेक्षा जास्त वेळा हात धुण्याच्या सवयीमुळेही तुम्ही आजारी पडू शकता.

मग प्रश्न निर्माण होतो की, निरोगी राहण्यासाठी व्यक्तीने किती वेळा हात धुतले पाहिजे? हेल्थ एक्सुपर्टनुसार, आपल्या त्वचेवर दोनप्रकारचे बॅक्टेरिया असतात. एका ते जे आपल्याला आजारी करतात आणि दुसरे ते जे आपला आजारांपासून बचाव करतात.

हात धुतल्याने हेल्दी नसलेले बॅक्टेरिया तर निघून जातात. पण हेल्दी बॅक्टेरिया त्वचेवरच राहतात. पण पुन्हा पुन्हा हात धुतल्याने या हेल्दी बॅक्टेरियाला नुकसान पोहचतं.

हेल्दी राहण्यासाठी हात स्वच्छ करणे गरजेचे आहे. पण प्रमाणापेक्षा जास्त हात वेळ हात धुतल्याने त्वचेवरील हेल्दी ऑइल निधून जातं आणि त्वचा कोरडी होते.

त्वचा कोरडी झाल्याने यावर असलेले हेल्दी बॅक्टेरियाही निघून जातात. हेल्दी बॅक्टेरिया आपला अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात.

हेल्थ एक्सपर्टनुसार, हातावर पुन्हा पुन्हा सॅनिटायझरचा वापर केल्यानेही आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. तसेच जे लोक सॅनिटायझरचा अधिक वापर करतात ते लवकर आजारी पडतात.

पण याचा अर्थ हा नाही की, तुम्ही हातच धुवू नये. निरोगी राहण्यासाठी हात स्वच्छ करणे फार गरजेचे आहे. कारण हातांच्या माध्यमातून बॅक्टेरिया आपल्या शरीरात जातात आणि याने आजार होतात.

त्यामुळे तुम्हाला हे समजून घेणे जास्त गरजेचे आहे की, तुम्हाला हात स्वच्छ करणे केव्हा सर्वात जास्त गरजेचे वाटतं. उदाहरणार्थ टॉयलेटमधून आल्यावर हात स्वच्छ करणं गरजेचं आहे. सोबतच जेवण करण्याआधीही हात स्वच्छ करणे गरजेचे आहे. पण जर तुम्ही जमिनीवर पडलेली एखादी वस्तू उचलली तर केवळ सॅनिटायझरचा वापर करु शकता.