नेहमी फिट राहण्यासाठी लाइफस्टाईलमध्ये कोणते बदल करावे?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 04:43 PM2023-10-26T16:43:49+5:302023-10-26T16:58:46+5:30

Fitness Tips : जर तुम्ही रोज एकच गोष्ट करत राहिलात तर तुम्हाला कंटाळा येईल, त्यामुळे बदल करत राहणे गरजेचं आहे.

आजकालच्या धावपळीच्या जीवनात नियमित फिट राहणं किंवा निरोगी राहणं फारच अवघड झालं आहे. अनेक लोक फिट आणि निरोगी राहण्यासाठी रोज एक्सरसाइज करतात आणि इतरही काही गोष्टी करतात. पण यात सातत्य फार महत्वाचं ठरतं.

जर तुम्ही रोज एकच गोष्ट करत राहिलात तर तुम्हाला कंटाळा येईल, त्यामुळे बदल करत राहणे गरजेचं आहे. अशाच काही खास गोष्टी ज्यांनी तुम्हाला फिट राहण्यास मदत मिळेल.

1) फिट राहण्यासाठी दिवसाची सुरूवात चहा किंवा कॉफीने न करता ताज्या फळांचं सेवन करून करावी. फळांच्या जागी तुम्ही किशमिश किंवा बदामही खाऊ शकता. मोड आलेलं कडधान्यही खाऊ शकता.

2) ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरमध्ये एक चमचा तूपाचं सेवन करा. तूपाच्या नियंत्रित सेवनान ब्लड प्रेशर, पोटाच्या समस्या, अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होण्यास मदत मिळते. सोबत हेल्दी पदार्थांचं सेवन करा.

3) फिट राहण्यासाठी तुमच्यातील कमजोरी कमी करण्याचीही गरज असते. जर तुम्हाला एखादी एक्सरसाइज करण्यास अडचण होत असेल तर त्यावर काम करा. जेणेकरून इतर एक्सरसाइजप्रमाणे तुम्ही ती एक्सरसाइज सुद्धा व्यवस्थित करू शकाल.

4) गॅजेट्सचा वापर कमी करा. संपूर्ण दिवस गॅजेट्सचा वापर केल्याने तुमच्या मानेत वेदना होऊ लागेत. सोबतच जास्त गॅजेट्सचा वापर केल्याने वेगवेगळ्या समस्याही होऊ लागतात. आरोग्यासंबंधी समस्या टाळायच्या असतील तर गॅजेट्सचा वापर टाळावा.

5) प्रोसेस्ड फूडचं सेवन करणं बंद करा. हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. याने केवळ सामान्यच नाही तर वेगवेगळ्या गंभीर समस्याही होऊ शकतात. जर तुमची काही खाण्याची इच्छा असेल तर प्रोसेस्ड फूडऐवजी तुम्ही हेल्दी पदार्थांचं सेवन करा.

6) एक्सरसाइज, लाइफस्टाईलमध्ये बदल करण्यासोबतच पुरेशी झोप घेणेही तेवढंच महत्त्वाचं आहे. याने तुम्हाला दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटतं. रात्री उशीरापर्यंत जागून टीव्ही बघू नका, त्याऐवजी झोप घ्यावी. याने तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.