तीन मुलांचा बाप रोनाल्डो चौथ्या लग्नाच्या तयारीत... १४ वर्षांनी लहान मॉडेलशी करतोय लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 01:47 PM2023-02-13T13:47:40+5:302023-02-13T13:50:37+5:30

रोनाल्डो चौथ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. ४६ वर्षीय रोनाल्डो लवकरच मॉडेल गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार आहे. कॅरेबियन बेटावर सुट्टीवर असताना रोनाल्डोने गर्लफ्रेंड सेलिना हिला प्रपोज केले.

ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डो चौथ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. ४६ वर्षीय रोनाल्डो लवकरच मॉडेल गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार आहे. कॅरेबियन बेटावर सुट्टीवर असताना रोनाल्डोने गर्लफ्रेंड सेलिना हिला प्रपोज केले.

रिअल माद्रिद आणि इंटर मिलानचा माजी स्ट्रायकर रोनाल्डो याची फुटबॉल कारकीर्द उल्लेखनीय राहिली. त्याने या वर्षी जानेवारीमध्ये मॉडेल सेलिना लॉकशी खाखरपुडा कला.

सेलिनाने सोशल मीडियावर रोनाल्डोसोबतचा एक फोटो शेअर केला आणि ज्यामध्ये ती तिच्या एंगेजमेंट डायमंड रिंगला फ्लॉंट करताना दिसत आहे. सेलिनाने लिहिले, 'होय मी तुझ्यावर प्रेम करते. प्रत्युत्तरात रोनाल्डोने 4 इमोजी पोस्ट केले आणि लिहिले, 'लव्ह यू.'

रोनाल्डो आणि सेलिना यांचे अभिनंदन करणाऱ्यांमध्ये या दिग्गज फुटबॉलपटूच्या पहिल्या पत्नीचाही समावेश होता. रोनाल्डोची माजी पत्नी मिल्ने डोमिंग्वेझने लिहिले, 'मी तुझ्यासाठी आनंदी आहे. देव तुम्हाला सुरक्षित ठेवो आणि प्रेम अखंड राहो.

रोनाल्डोचा मोठा मुलगा २२ वर्षांचा आहे. मिल्ने डोमिंग्वेझ या पत्नीपासून तिला हा मुलगा झाला आहे. मिल्ने आणि रोनाल्डोचे लग्न चार वर्षांनंतर तुटले. सप्टेंबर २००३ मध्ये दोघे वेगळे झाले.

रोनाल्डोने फेब्रुवारी २००५ मध्ये मॉडेल डॅनिएलाशी लग्न केले. दोघांनी कधीही आपले नाते अधिकृत केले नाही. दोघांनी आलिशान राजवाड्यात लग्न केले. डॅनियलने रोनाल्डोवर आरोप करत संबंध संपवले. दोघांचे हे लग्न ३ महिने चालले.

डॅनिएलानंतर रोनाल्डोला माजी फुटबॉलपटू आणि अभियांत्रिकी विद्यार्थिनी मारिया बीट्रिझ अँटोनी हिचा आधार मिळाला. या जोडप्याला दोन मुली आहेत. पहिल्या मुलीचे नाव मारिया सोफिया आहे आणि ती १४ वर्षांची आहे, तर दुसऱ्या मुलीचे नाव मारिया एलिस आहे आणि ती १२ वर्षांची आहे. हे लग्न ७ वर्षे टिकले.

रोनाल्डो आणि सेलिना ७ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सेलिना एक मॉडेल असण्यासोबतच एक यशस्वी बिझनेस वुमन आहे. ९८ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या रोनाल्डो आणि सेलिना यांनी अद्याप हे दोघे लग्न केव्हा होणार हे जाहीर केलेले नाही.

सेलिना रोनाल्डोपेक्षा १४ वर्षांनी लहान आहे. ती सोशल मीडियावर रोनाल्डोसोबतचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. ४६ वर्षीय रोनाल्डो विश्वचषक चॅम्पियन संघाचा भाग आहे.