'मागे वळून पाहताना' - 2018 मध्ये सोशल मीडियावर यांचा 'धुमाकूळ'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 03:20 PM2018-12-26T15:20:36+5:302018-12-26T15:31:53+5:30

Diet Sabya हे इंस्टाग्राम अकाऊंट असून याची चांगलीच चर्चा यंदा झाली होती. डाएटसंदर्भातील माहिती या अकाऊंटवरुन दिली जाते. 1 लाख 31 हजार फॉलोअर्स आहेत.

नेटफ्लिक्स या युट्यूब सर्व्हीसची सुरुवात 2016 मध्ये झाली. पण, सॅक्रेड गेम्समुळे यंदा नेटफ्लिक्सला मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे त्यांचा युजर्सबेस वाढला.

या वर्षाच्या सुरुवातीला पद्मावत हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्यामुळे दीपिका पदुकोण इंटनेटवर अधिकच चर्चेत आली. तर, तिची फॅशन, तिचा लूक अन् रणवीरसिंग सोबतच्या लग्नामुळे ती यंदा लाईमलाईटमध्ये होती.

बॉलिवूड अक्ट्रेस आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माचा एक फोटो यंदा खूपच व्हायरल झाला होता. सुई-धागा चित्रपटातील या फोटोने इंटरनेटवर धुमाकूळ घातला.

एक आँख मारी अन् वो लडकी दुनिया मे फेमस हो गयी, अशीच सत्य घटना मॉडेल अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर हिच्या बाबतीत घडली. एका गाण्यातील भूमिकेवेळी प्रियाने डोळा मारला अन् इंटरनेटवर तरुणाई घायाळ झाली.

फुटबॉल टीम इंडियाचा कर्णधार सुनिल छेत्रीने भारतीयांना केलेलं अपील यंदा नेटीझन्सने डोक्यावर घेतलं. मुंबईतील फुटबॉल स्टेडियममध्ये केनियाविरुद्धचा सामना पाहण्याची विनंती सुनिलने केली होती.

बिहारचे माजी मंत्री लालूप्रसाद यादवांचे चिरंजीव तेज प्रताप यांच्या प्रतापाचीही दखल सोशल मीडियाने घेतली. श्रीकृष्णाच्या वेशात, भगवान शंकरच्या वेशातील त्यांचे फोटो व्हायरल झाले होते.

विराट कोहलीच्या एका ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेलं ट्विट चांगलंच चर्चेत आलं होतं. ज्यांना भारतीय फलंदाज आवडत नाहीत, त्यांनी देश सोडून जावं, असे ट्विट कोहलीनं केलं होते. ते यंदा ट्रेडिंगमध्ये होते.

प्रिया प्रकाशनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसद सभागृहात मारलेला डोळा, इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला. तसेच मोदींनी दिलेली जादू की झप्पीचा फोटोही व्हायरल झाला.

डान्सिंग अंकल अन् चाय पी लो वाली वुमेन हेही यंदाच्या वर्षी सोशल मीडियाचे हिरो ठरले आहेत. या अंकलचा डान्स अन् वुमेनच्या डायलॉगने धुमाकूळ घातला होता.