Board Exam : बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण हवेत? तर आजच बदला ‘या’ सात सवयी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 09:48 AM2023-03-17T09:48:47+5:302023-03-17T09:54:00+5:30

बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी वर्षभर मेहनत करतो, मात्र काही वेळा अपेक्षेप्रमाणं निकाल लागत नाही.

बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी वर्षभर मेहनत करतो, मात्र काही वेळा अपेक्षेप्रमाणं निकाल लागत नाही. यामागे काही सवयी असू शकतात, ज्या बदलून तुम्ही परीक्षेत तुमचं बेस्ट देऊ शकता. चला त्या सवयी जाणून घेऊया ज्या प्रत्येक विद्यार्थ्यानं बदलल्या पाहिजेत.

स्टडी मटेरिअल सातत्यानं वाचणं - अनेकदा विद्यार्थी चुकून किंवा विसरण्याच्या भीतीने अभ्यासाचं साहित्य पुन्हा पुन्हा वाचण्यात वेळ वाया घालवतात. यामुळे वेळही वाया जातो आणि आत्मविश्वास कमी होतो.

नवा टॉपिक वाचणं - परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक नोट्स, विषय आणि अभ्यासाचं साहित्य वाचायचं असतं. अशा वेळी नवीन विषय किंवा अभ्यास साहित्य वाचणं टाळावं, उलट उजळणीवर भर द्यावा.

सोशल मीडिया - तयारीच्या वेळी सोशल मीडियावर जास्त ॲक्टिव्ह राहिल्यानं तुमचे लक्ष अभ्यासापासून विचलित होऊ शकतं. तुम्हालाही सोशल मीडियावर वेळ घालवण्याची सवय असेल तर ती आजच बदला.

तहान-भूक विसरणं - परीक्षेच्या वेळी विद्यार्थी अधिकाधिक अभ्यास करण्याच्या प्रक्रियेत आपलं खाणंपिणं विसरून जातात. ही एक चुकीची सवय आहे, उलट अभ्यास करताना आरोग्यदायी आहाराचीही काळजी घ्यावी.

पुरेशी झोप न घेणं - अनेकदा विद्यार्थी परीक्षेच्या दिवसांमध्ये लवकर उठून रात्री उशिरापर्यंत अभ्यास करतात, ही चुकीची सवय आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल.

टाईम मॅनेजमेंट - विद्यार्थ्यांना अनेकदा वेळापत्रक बनवून अभ्यास करण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्या अभ्यासासाठी सेक्शन नुसार वेळेचं व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे.

प्रश्नपत्रिका नीट न वाचणं - विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १५ मिनिटं देण्यात येतात. अनेकदा विद्यार्थी प्रश्नपत्रिका वाचण्याऐवजी प्रश्न सोडवू लागतात. ही सवय बदलायला हवी.