Career In SEO: SEO स्पेशलिस्ट बनून करा लाखोंची कमाई, १० पॉईंटमध्ये समजून घ्या योग्यता, कोर्स आणि सॅलरी डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 02:43 PM2022-03-28T14:43:43+5:302022-03-28T14:59:56+5:30

SEO Career Opportunities in Digital Media: डिजिटल जगात असे अनेक करिअर पर्याय आहेत जिथं कमाईच्या भरपूर संधी आहेत. त्यापैकी एक करिअर पर्याय म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO).

SEO Career Opportunities in Digital Media: डिजिटल जगात असे अनेक करिअर पर्याय आहेत जिथं कमाईच्या भरपूर संधी आहेत. त्यापैकी एक करिअर पर्याय म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO). इंटरनेट आणि डिजिटल जगाचं महत्त्व सातत्यानं वाढत आहे. ऑनलाइन व्यवसायांची संख्या वाढल्यानं कंपन्यांसाठी लोकांपर्यंत त्यांची पोहोच वाढवणं दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहे. सध्या उत्पादनांचं डिजिटल मार्केटिंग केलं जात आहे आणि त्यासाठी नवीन टूलकिटचा वापर केला जात आहे.

एसइओच्या माध्यमातून कंटेंट निर्मिती आणि प्रमोशनचं काम केलं जात आहे. अधिकाधिक यूजर्सपर्यंत पोहोचता यावं यासाठी उत्पादनं सर्च इंजिन आणि सोशल मीडिया फ्रेंडली बनवली जात आहेत. आजकाल सर्व मोठ्या आणि लहान कंपन्या त्यांच्या बजेटचा चांगला भाग SEO वर खर्च करत आहेत. या संदर्भात, एसइओ तज्ञांची मागणी सतत वाढत आहे.

डिजिटल मार्केटिंगमध्ये रस असलेले तरुण एसइओमध्ये प्रभुत्व मिळवून महिन्याला लाखो रुपये कमवू शकतात. हे क्षेत्र प्रगतीचा मार्ग सुकर करतं. आता तुमच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत असतील. एसइओ म्हणजे काय? या क्षेत्रातील तज्ञ काय करतात? करिअर करण्यासाठी कोणत्या पात्रता आवश्यक आहेत? कोणता कोर्स कुठून करायचा? तुम्ही किती कमावणार? हे सर्वकाही 10 मुद्द्यांमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करुयात.

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (Search engine optimization) हा डिजिटल मार्केटिंगचा एक भाग आहे, जो कोणत्याही वेबसाइटचे रँकिंग वाढवण्यासाठी वापरला जातो. जर कोणत्याही व्यावसायिकानं आपली वेबसाइट तयार केली तर त्याचं पहिलं प्राधान्य हे त्याची वेबसाइटवर जास्तीत जास्त लोकांनी पाहावी हे असतं. म्हणूनच लोकांपर्यंत पोहोच वाढवण्यासाठी SEO तज्ञांची मदत घेतली जाते. एसइओचा वापर केवळ वेबसाइटसाठीच नाही तर यूट्यूब चॅनल आणि ब्लॉगसाठीही केला जातो.

एसइओ प्रोफेशनल Google आणि इतर सर्च इंजिनांवर त्यांच्या वेबसाइटला प्रमोट करतात. सहसा इंटरनेट युजर्स फक्त टॉप रिसर्च निवडतात. त्यामुळे वेबसाइट रँकिंगचा थेट परिणाम उत्पन्न आणि उत्पादन मूल्यावर होतो. म्हणूनच एसइओ प्रोफेशनल्सना डिजिटल जगात आयकॉनिक नॉलेज वर्कर्स असं म्हटलं जातं. कारण ते कोणत्याही उत्पादनासाठी किंवा वेबसाइटसाठी हिट्स आणतात.

सर्च इंजिन अल्गोरिदममध्ये वेगानं अपडेट्स होत असतात, म्हणूनच एसइओ करिअरमध्ये सतत अपडेट राहणं आणि प्रभुत्व मिळवणं आवश्यक आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुम्हाला मार्केट ट्रेंड आणि सर्च इंजिन अपडेट्सवर लक्ष ठेवावं लागेल. डिजिटल मार्केटिंगचे बारकावे समजून घेण्याव्यतिरिक्त, वेब फंडामेंटल, डेटाबेस तंत्रज्ञान आणि वेबसाइट व्यवस्थापनाचे ज्ञान खूप महत्वाचं आहे. या क्षेत्रातील नोकरीसाठी उत्कृष्ट संभाषण कौशल्य आवश्यक आहे. कंटेंट समजून घेण्यासाठी इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे कारण कटेंटनुसार वेबसाइटचं प्रमोशन केलं जातं.

सुरुवातीच्या काळात फक्त सर्ज इंजिन व्हिजिब्लिटी-रँकिंगसाठी अॅडमिन आणि वेबसाइट डेव्हलपर्स हेच वेबसाइट सेट करायचे. पण आता तसं राहिलेलं नाही. तुम्हाला मार्केटिंग, ब्लॉगिंग, अॅनालिटिक्सची आवड असेल तर करिअरसाठी हे योग्य क्षेत्र आहे. या क्षेत्रात झपाट्यानं वाढ होत आहे, जिथं वाढत्या कौशल्यांसह तुम्ही डिजिटल मार्केटिंग व्यवस्थापक बनू शकता. एसइओ उद्योगात फ्रीलान्सिंगच्या अनेक संधी आहेत.

SEO हे एक क्षेत्र आहे जिथं तुम्ही अनुभवातून शिकता. हे सहसा विद्यापीठांमध्ये पारंपारिक अभ्यासक्रम म्हणून शिकवलं जात नाही, म्हणून या क्षेत्रातील तज्ञ होण्यासाठी नोकरीपासून सुरुवात करा.

नील पटेल, ब्रायन डीन, रँड फिश, बॅरी श्वार्ट्झ सारख्या SEO इंडस्ट्रीमधील लीडर्सना फॉलो करा आणि त्यांच्या अनुभवातून शिका. मार्केटिंग तज्ञांशी सातत्यानं संपर्कात राहा किंवा संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. त्यांची पुस्तकं, लेख आणि ब्लॉग वाचा.

तुम्ही जर सायन्सचे विद्यार्थी नसलात तरीही, तुम्ही एसइओमध्ये करिअर सुरू करू शकता. फक्त तुम्हाला काही तांत्रिक संकल्पना समजून घेणं आवश्यक आहे. काम करण्यासोबतच तुम्ही त्यात पारंगत व्हाल.

SEO चे बारकावे जाणून घेण्यासाठी तुम्ही शॉर्ट टर्म ऑनलाइन कोर्स करू शकता. तुम्ही ऑनलाइन ग्रुप किंवा फोरममध्ये सामील होऊ शकता. काही खासगी संस्था ऑनलाइन अभ्यासक्रम देतात; त्यांच्याबद्दल शोधा आणि सामील व्हा.

सध्या मोठ्या शहरांमध्ये SEO प्रशिक्षण केंद्रं सुरू झाली आहेत, जिथं ३ ते ६ महिने कालावधीचे सर्टिफिकेट अभ्यासक्रम चालवले जातात. कोणताही 12वी पास किंवा पदवीधर तरुण या क्षेत्रात येऊ शकतो.

अनेक ऑनलाइन वेबसाइट SEO ची मूलभूत माहिती विनामूल्य देतात. याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. अॅडव्हान्स अभ्यासक्रम विनामूल्य नसले तरी तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही कोर्समध्ये सहभागी होऊ शकता. काही संस्था अभ्यासक्रम देखील ऑफर करतात, LIPS India – यांच्या मुंबई, पुणे आणि बंगलोर येथे शाखा आहेत. आयआयटी, आयआयएम आणि उद्योग तज्ञ ही संस्था चालवतात. डिजिटल विद्या, दिल्ली - दिल्ली स्कूल ऑफ डिजिटल मार्केटिंग - सीआयआयएम, चंदीगड

सध्या डिजिटल मार्केटिंग झपाट्यानं विकसित होत आहे आणि एसईओ हा त्यातील एक महत्त्वाचा पैलू आहे. या क्षेत्रात चांगलं काम करण्यासाठी, तुम्हाला डेटाबेस कनेक्टिव्हिटी, फाइल ट्रान्सफर प्रोटोकॉल, फाइल मॅनेजमेंट यासारख्या महत्त्वाच्या वेब बेसिक्स शिकल्या पाहिजेत. कंटेंट व्यवस्थापन प्रणाली (CMS) ची समज देखील आवश्यक आहे.

एसइओ मार्केटच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि तुमची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तुम्हाला वेब प्लगइन, स्कीमा मार्कअप, https 2 प्रोटोकॉल, इंटरनॅशनल SEO आणि पेजिनेशन यांसारखे टूल्स शिकण्याची गरज आहे. देशातील एसइओ तज्ञाचा सरासरी पगार ३ लाख ते १० लाखांदरम्यान असतो. फ्रीलांसर म्हणून, अनेक SEO विशेषज्ञ एका महिन्यात लाखो रुपये कमावतात.