साप्ताहिक राशीभविष्य: १० राशींना दमदार, नशिबाची साथ; सरकारी फायदा, नोकरी-व्यापारात लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 07:07 AM2024-01-01T07:07:07+5:302024-01-01T07:07:07+5:30

Weekly Horoscope: नववर्षाचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

नवीन वर्ष २०२४ ची सुरुवात असलेल्या या सप्ताहात कोणताही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- गुरू आणि हर्षल मेषेत, केतु कन्येत, बुध आणि शुक्र वृश्चिकेत, रवि आणि मंगळ धनूत, प्लूटो मकरेत, शनी कुंभेत, तर राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. चंद्राचे भ्रमण सिंह, कन्या आणि तूळ राशीतून राहील.

सोमवारपासून इसवी सन २०२४ ला प्रारंभ होत आहे. नवीन वर्ष २०२४ आपल्याला सुख, समृद्धी, प्रगतिदायक व भरभराटीचे जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ३१ डिसेंबर रोजी नवग्रहांचा गुरु बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रह मेष राशीत मार्गी झाला आहे. मेष राशीत गुरु वक्री होता. तर २०२४ मध्ये गुरु राशीपरिवर्तन करणार असून, वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.

नववर्षाच्या सुरुवातीला असलेली एकंदरीत ग्रहस्थिती पाहता, सन २०२४ चा पहिला आठवडा कोणत्या राशींसाठी सुखकारक, उत्तम लाभदायक आणि यशदायक ठरू शकेल, कोणत्या राशीच्या व्यक्तींना हा कालावधी काहीसा संमिश्र ठरू शकेल, ते जाणून घेऊया...

मेष: चढ-उतारांचा काळ आहे. लक्ष मुलांवर व मनातील इच्छांवर केंद्रित झालेले असेल. हे सर्व पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न कराल. मानसिक तणाव व आरोग्य विषयक समस्या त्रस्त करण्याची संभावना आहे. तेव्हा सावध राहावे. वैवाहिक जोडीदाराशी अधिक जवळीक साधाल. प्रेमीजनांसाठी आठवडा रोमँटिक आहे. नोकरी करणाऱ्यांच्या मनात नोकरी बदलण्याचे विचार येऊ शकतात. व्यापारी खुश असल्याचे दिसून येईल. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. ते काही नवीन विषयांवर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करतील.

वृषभ: नववर्षाची सुरुवात उमेदीने भरलेली ठरू शकेल. घरगुती खर्चांवर विशेष लक्ष द्याल. मातेच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने चेहेऱ्यावर आनंदाची छटा उमटेल. व्यापारात खूप मोठे यश मिळेल. काही नवीन काम कराल. एखादी नवीन भागीदारी करू शकता. फायदेशीर होईल अशा एखाद्या नवीन कामात हात घालू शकता. महिलांचे विशेष सहकार्य मिळाल्याने व्यवसाय तेजीत येईल. नोकरीत नवीन पदभार संभवतो. विद्यार्थ्यांना परिश्रमाचे चांगले परिणाम मिळतील. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनाचा भरपूर आनंद घेऊ शकतील.

मिथुन: एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. खास लोकांच्या सहवासात नवीन वर्षाचा आनंद लुटू शकाल. परंतु खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. व्यापारात यश प्राप्त होईल. नोकरीत खुश राहाल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना सुट्टीचा आनंद लुटण्याची संधी मिळेल.

कर्क: आगामी काळ अनुकूल आहे. आत्मविश्वास उंचावेल. प्राप्तीत वाढ झाल्याने जीवन यशस्वी होईल. ताप किंवा रक्तदाबाचा त्रास होण्याची संभावना आहे. नोकरीत स्थिती मजबूत राहील. कामगिरी उंचावू शकाल. व्यापारासाठी काहीसा प्रतिकूल काळ असल्याने थोडे सावध राहावे. नवीन जे काही करणार आहात त्याबाबत गुप्तता पाळावी. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुरळीत चालेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. ते स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ शकतील.

सिंह: मनात जे काही येईल तेच कराल व त्यातूनच फायदा होईल. व्यापारात खूप उंची गाठणारा काळ असेल. परिश्रम यशस्वी होतील. मनातील काही इच्छा पूर्ण होऊ शकतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामात यशाचे शिखर गाठू शकतील. परिश्रम प्रगतीस कारणीभूत ठरतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. कुटुंबात एकोपा असल्याचे दिसून येईल. आपसातील प्रेम वृद्धिंगत होईल. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकतील. जोडीदाराशी जवळीक वाढेल. विद्यार्थ्यांना अध्ययनात काही समस्यांना सामोरे जावे लागेल. असे असून अध्ययनावर लक्ष केंद्रित करू शकतील.

कन्या: आगामी काळ चांगला आहे. जमीन-जुमल्याशी संबंधित बाबी आकर्षित करतील. फायदा होईल. एखादे महत्वाचे काम जे दीर्घ काळापासून खोळंबलेले होते ते पूर्णत्वास जाईल. सरकारी क्षेत्रापासून एखादा लाभ संभवतो. जमीन किंवा घराचा लाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी फायदेशीर कालावधी आहे. सहकाऱ्यांसह फिरावयास जाण्याची संधी मिळू शकते. व्यक्तिगत संबंध दृढ होतील. व्यापारी परिश्रम व बुद्धिमत्तेच्या जोरावर यशस्वी होतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. विद्यार्थ्यांनी आजवर खूप परिश्रम केले आहेत. काही दिवस आराम करून इतर गोष्टीत मन रामवावे. अभ्यासात त्यांना चांगले परिणाम मिळतील. अति मसालेदार पदार्थ टाळावेत.

तूळ: आठवडा अनुकूल आहे. नोकरीच्या ठिकाणी कामावर पूर्ण लक्ष द्याल. मनात भावुकता असल्याने कुटुंबाकडे लक्ष द्याल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. व्यापारास अनुकूल आहे. योजना मान-सन्मानाव्यतिरिक्त उत्तम धन प्राप्त करून देतील. खर्च होतील. कुटुंबात आनंद पसरेल. एखादा सोहळा संभवतो. मित्र मदत करतील. फिरावयास जाण्याची संधी मिळेल. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. विद्यार्थ्यांना प्रगतीची संधी मिळेल. अभ्यासात चांगले परिणाम मिळतील.

वृश्चिक: आत्मविश्वास उंचावल्याने कामात यश प्राप्ती होईल. व्यापारात खूप मोठे यश प्राप्त होऊन चांगला फायदा होईल. असे झाल्यामुळे ते कामगारांसाठी काही चांगल्या योजना राबवू शकतील किंवा त्यांना बोनस देऊ शकतील. सरकारी क्षेत्राकडून चांगला फायदा मिळण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्रगतीची संधी मिळेल. पदोन्नती संभवते. पगारवाढ संभवते. प्रखर बुद्धिमत्ता व शांत स्वभावाचा लाभ घेऊ शकाल. वैवाहिक जीवन प्रेमाने ओथंबून जाईल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. परिश्रम यश प्रदान करतील.

धनु: अचानकपणे नशिबाची साथ मिळाल्याने प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतील. परंतु मनात थोडा क्रोध वाढेल, जो नातेसंबंधांसाठी मारक ठरेल. जोडीदाराशी कटुता वाढू शकते. तेव्हा काळजी घ्यावी. प्रकृतीची काळजी घ्यावी. अति क्रोध करणे टाळावे. खर्च नियंत्रित करण्याचा प्रयत्न करावा. नोकरीतील कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी अजून जोर लावाल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होईल. विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन अभ्यास करण्याची संधी मिळू शकते. बुद्धिमत्तेच्या जोरावर शिष्यवृत्ती मिळवू शकतील.

मकर: व्यापारातील प्रगती बघून खुश होऊन परिश्रम अजून वाढवू शकाल. भविष्यात चांगले संकेत मिळतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. वरिष्ठ कामगिरीने प्रभावित होतील. ते आपल्या पाठीशी राहतील. नोकरीतील स्थिती मजबूत होईल. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात सुखी राहिले तरी, काही समस्या निर्माण करण्याची संभावना आहे. तेव्हा सावध राहावे.

कुंभ: वैवाहिक जोडीदारासह खरेदी करण्यास जाऊ शकता. एखाद्या ठिकाणी फिरावयास घेऊन जाऊ शकता. नाते दृढ होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. कामाचा आनंद घेऊ शकाल. कामाच्या ठिकाणी समन्वय उत्तम असेल. वरिष्ठांशी किरकोळ वाद संभवतात. ते टाळण्याचा प्रयत्न करावा. व्यापारासाठी आठवडा चांगला आहे. योजना यशस्वी होतील. बाजारातून अपेक्षित असलेला लाभ मिळवू शकाल. विद्यार्थ्यांना प्रगतीची संधी मिळेल. एखादा नवीन मित्र होईल, जो अभ्यासात मदत करू शकेल.

मीन: कुटुंबाकडे पूर्ण लक्ष द्याल. कौटुंबिक जबाबदाऱ्या समजून घेऊन घरगुती कामासाठी योगदान द्याल. व्यावसायिक जीवनाचा समतोल साधण्याचा प्रयत्न कराल. दोन्ही ठिकाणी समतोल साधून हा आठवडा चांगला जाईल. नोकरीत कामगिरी उत्तम होईल. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. व्यापाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील. व्यापारात प्रगती होईल. विवाहित व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात काहीसा तणाव असल्याचे दिसू शकते. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील.