संकष्ट चतुर्थी: ९ राशींवर बाप्पाची कृपा, नवीन कंत्राटातून नफा; येणी वसूल होतील, उत्तम काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 07:07 AM2024-02-26T07:07:07+5:302024-02-26T07:07:07+5:30

Weekly Horoscope: फेब्रुवारीची सांगता आणि मार्चची सुरुवात तुमच्यासाठी कशी असेल? जाणून घ्या…

फेब्रुवारी महिन्याच्या सांगतेला आणि मार्च महिन्याची सुरुवात होताना ग्रह गोचर नाही. ग्रहस्थिती अशी गुरु आणि हर्षल मेषेत, केतू कन्येत, मंगळ, शुक्र आणि प्लूटो मकरेत, रवी, बुध आणि शनी कुंभेत, तर राहू आणि नेपच्यून मीन मीन राशीत आहेत. चंद्राचे भ्रमण सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीतून राहील.

या महिन्याची सांगता होत असताना कालभैरव यात्रा गडहिंग्लज, संत नरहरी सोनार पुण्यतिथी, संकष्ट चतुर्थी, चिंतामणी गणेश जन्मोत्सव दिन, औदुंबर पंचमी, श्रीकृष्ण सरस्वती महाराज जयंती आहे. विशेष म्हणजे सन २०२३ मध्ये फेब्रुवारीचा महिना २९ दिवसांचा असणार आहे.

एकूणच ग्रहस्थिती पाहता संकष्ट चतुर्थीनंतर फेब्रुवारीची होणारी सांगता आणि मार्च महिन्याचा होणारा प्रारंभ कोणत्या राशींसाठी अनुकूल, सकारात्मक ठरू शकेल? आर्थिक आघाडी, कुटुंब, शिक्षण, करिअर, व्यापार, व्यवसाय या स्तरांवर आगामी काळ कसा ठरू शकेल? ग्रहस्थितीचा प्रभाव कसा असेल? जाणून घ्या...

मेष: व्यवसाय वृद्धी करण्यात यशस्वी मिळू शकेल. व्यवसायाशी संबंधित प्रवास करण्याची संधी मिळेल. नोकरीत प्रगती होईल. विवाहितांना वैवाहिक जीवनाकडे लक्ष द्यावे लागेल. एखाद्या अन्य व्यक्तीमुळे त्यांच्या जीवनात कटुता येऊ शकते. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल काळ आहे. घर खरेदी करावयाचे असेल तर त्याबाबत विचार करू शकता. प्रलंबित कामे पूर्णत्वास जातील. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांसह आपण खरेदीस व सहलीस जाल. विवाहेच्छुकांच्या विवाहाची बोलणी संभवतात.

वृषभ: अत्यंत चांगला काळ आहे. सुख-शांतता नांदेल. वैवाहिक जोडीदारासह एखादा प्रवास करू शकता. शैक्षणिक क्षेत्रात मन अभ्यासाव्यतिरिक्त सामाजिक जीवनावर व्यतीत कराल. उच्च शिक्षणासाठी अनुकूल काळ आहे. परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या नोकरीत खुश असल्याचे दिसून येईल. व्यापाऱ्यांना नवीन कंत्राट मिळेल. लाभ मिळाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. गुंतवणुकीसाठी कालावधी विशेष अनुकूल नाही. गुंतवणूक करावयाचीच असेल तर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीच्या सल्ल्यानेच ती करावी. प्रकृतीची काळजी घ्यावी.

मिथुन: जीवनात चढ-उतार होत असल्याचे जाणवेल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. घरात पूजा-पाठ, हवन इत्यादींचे आयोजन होईल. कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकांची वर्दळ वाढेल. उच्च शिक्षणासाठी काळ अनुकूल आहे. अभ्यास मन लावून करावा लागेल. कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाण - घेवाण विचारपूर्वकच करावी लागेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. नवीन कामे करावयास मिळतील. प्राप्तीत वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी संवाद साधताना वाणीत माधुर्य ठेवावे. व्यापार करणाऱ्या व्यक्तींच्या व्यापारानिमित्त नवीन ओळखी होतील.

कर्क: वैवाहिक जीवनात सुख-शांतता असल्याचे जाणवेल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. धनसंचय कसा करावा हे शिकून घ्याल. प्रणयी जीवन सुखावह होईल. विवाहेच्छुकांसाठी योग्य प्रस्ताव येईल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. उच्च शिक्षणासाठी काळ अनुकूल आहे. व्यापाऱ्यांना नवीन कंत्राट मिळाल्याने मोठा लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. घर सजावटीसाठी खूप पैसा खर्च कराल. मुलांच्या शिक्षणावर भरपूर पैसा खर्च होईल.

सिंह: मिश्र फलदायी काळ आहे. उच्च शिक्षणासाठी काळ अनुकूल आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, ते त्यात यशस्वी होतील. जोडीदाराच्या सहवासात थोडा वेळ घालवून ज्या काही समस्या आहेत त्यांचे निराकरण करावे. अहंकारास दूर सारावे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. व्यापारी आपल्या व्यापार वृद्धीसाठी मित्र व सहकाऱ्यांची मदत घेतील. नवीन कंत्राट मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. खर्चात वाढ होईल. कुटुंबियांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काही खरेदी कराल.

कन्या: अत्यंत चांगला काळ आहे. प्रेमिकेची व कुटुंबियांची भेट घडवून आणण्याची संधी मिळू शकेल. वैवाहिक जीवन सुखद होईल. कुटुंबियांत सर्वजण खुश झाल्याचे दिसून येईल. हा कालावधी अत्यंत खर्चिक असा आहे. एखादी जमीन खरेदी करावयाची असेल तर ती करू शकता. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर मेहनत वाढवावी लागेल. व्यापाऱ्यांना व्यापार वृद्धी करण्यात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्यांना नोकरीत प्रगती करण्याची संधी मिळेल. वरिष्ठांचे व कनिष्ठांचे सहकार्य मिळेल. विवाहेच्छुकांसाठी योग्य प्रस्ताव येतील.

तूळ: स्थगित असलेली कामे पूर्ण कराल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. वैवाहिक जोडीदारास एखादे नवीन कार्य सुरु करून देऊ शकता. वडील व्यापारात पैसा खर्च करतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने थकबाकी मिळवू शकाल. नवीन लोकांच्या ओळखी होतील. व्यापारास पुढे घेऊन जाण्यात यशस्वी व्हाल. कामाची प्रशंसा होईल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल. नोकरीत प्रगती होत असल्याचे दिसून येईल. उच्च शिक्षणासाठी काळ अनुकूल आहे. शेअर्स बाजारात दीर्घ काळासाठी गुंतवणूक करू शकता. नवीन वाहन खरेदी करण्यात पैसा जास्त खर्च होईल.

वृश्चिक: आगामी कालावधी खूपच चांगला आहे. वैवाहिक जीवनात शांतता नांदेल. विवाहेच्छुकांना मनपसंत जोडीदार मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. दीर्घकाळासाठी एखादी गुंतवणूक करू शकता. परदेशातून नवीन व्यापारी कंत्राट मिळतील. नोकरी करणाऱ्यांनी नोकरीत टिकून राहणे हितावह होईल. नवीन नोकरीची ऑफर येईल. स्वतःसाठी खूप खर्च कराल. जमिनीची खरेदी करू शकता. कुटुंबीय एकजुटीने काम करत असल्याचे दिसून येईल. मनःशांतीसाठी थोडा वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवाल.

धनु: एखादी चांगली बातमी मिळाल्याने अत्यंत खुश झाल्याचे दिसून येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जुने मित्र भेटतील. जुन्या स्मृती ताज्या होतील. विवाहेच्छुकांच्या विवाहावर शिक्कामोर्तब होईल. मांगलिक कार्यक्रमाचे आयोजन होईल. भावंडांचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नवीन नोकरीची ऑफर येईल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळेल. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल. व्यापारी व्यवसायात नवीन तंत्राचा वापर करतील. शेअर्स बाजारात गुंतवणूक करण्यासाठी काळ प्रतिकूल आहे. पैश्यांची बचत उत्तम करू शकाल. खर्चांवर नियंत्रण ठेवल्याने हे शक्य होईल.

मकर: विवाहित व्यक्ती जोडीदारासह वेळ घालविण्यासाठी बाहेर फिरावयास जाऊ शकतात. एकमेकांसह मनातील विचारांची देवाण - घेवाण करण्यासाठी वेळ काढाल. कार्यक्षेत्रात व्यस्त राहिल्यामुळे प्रेमिकेकडे लक्ष देऊ शकणार नाही. वाद होऊ शकतो. नात्यात कटुता येऊ शकते. दोन्हीकडे योग्य समन्वय साधल्यास हितावह होईल.

कुंभ: ऊर्जा निर्माण होऊ शकेल. स्थगित झालेली कामे पूर्वीपेक्षा कमी वेळात पूर्ण करू शकाल. शासकीय योजनांचा लाभ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून प्रशंसा ऐकण्यास मिळेल. व्यापारवृद्धी करण्यात यशस्वी व्हाल. विवाहेच्छूकांना मनपसंत जोडीदार मिळेल. विवाहित व्यक्ती जुने मतभेद विसरून पुढे जात असल्याचे दिसून येईल. मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक कराल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. स्पर्धेची तयारी करत असणाऱ्यांना जास्त मेहनत करूनच यश प्राप्त होईल. जमीन व शेअर्स बाजारात गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल काळ आहे. स्वतःसाठी एखादी वस्तू खरेदी करू शकता. कर्ज घ्यावयाचे असेल तर ते सहजपणे मिळू शकेल.

मीन: प्रेमात असलेल्या व्यक्तींमध्ये काही दुरावा निर्माण झाला असेल तर संपुष्टात येऊ शकेल. विवाहेच्छुकांच्या विवाहावर शिक्कामोर्तब होईल. मांगलिक कार्यक्रमाचे आयोजन होईल. कुटुंबियांसह एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचे आयोजन कराल. वैवाहिक जीवनात सुख-शांतता नांदेल. निष्कारण खर्च करावा लागेल. प्राप्तीत वाढ होईल. एखाद्या प्रॉपर्टीची खरेदी करण्यासाठी कर्ज घ्यावयाचे असेल तर ते सहजपणे मिळू शकेल. शेअर्स बाजारात गुंतवणूक करण्यासाठी कालावधी अनुकूल आहे. नोकरीत बदल करण्यासाठी काळ अनुकूल आहे. व्यापाऱ्यांना नवीन संधी मिळाल्याने व्यवसायाची प्रगती होईल. प्रतिष्ठा चोहोबाजूस पसरवण्यात यशस्वी व्हाल.