Dussehra 2022: माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा खास दिवस आहे दसरा, हे उपाय केल्यास जीवनात होईल धनाचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2022 11:05 AM2022-10-04T11:05:41+5:302022-10-04T11:08:31+5:30

Dussehra 2022: वाईटावर चांगल्याच्या, असत्यावर सत्याच्या विजयाचा दिवस म्हणून दसरा साजरा केला जातो. दसरा हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीही खूप खास असा दिवस आहे. धनप्राप्तीसाठी या दिवशी केलेले उपाय खूप लाभदायक आहेत.

वाईटावर चांगल्याच्या, असत्यावर सत्याच्या विजयाचा दिवस म्हणून दसरा साजरा केला जातो. दसरा हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीही खूप खास असा दिवस आहे. धनप्राप्तीसाठी या दिवशी केलेले उपाय खूप लाभदायक आहेत.

यावर्षी ५ ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाणार आहे. या दिवशी रावण दहनही केलं जातं. याच दिवशी माता दुर्गेने महिषासुराचा वध केला होता. तर श्रीरामांनी रावणाचा वध केला होता. म्हणून या दिवसाला विजयादशमी असंही म्हटलं जातं.

धनप्राप्तीसाठी दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी कुठल्याही मंदिरामध्ये माता लक्ष्मीचं ध्यान करून झाडू दान करावी. त्यामुळे खूप धन आणि समृद्धी मिळते.

कायदेशीर प्रकरणांमध्ये यश मिळवण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावावा. तसेच सुंदरकांडचे पठण करावे. त्यामुळे संकटे दूर होतात.

नोकरी आणि व्यापारामध्ये येणार अडथळे दूर करण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी ओम विजयाये नम: या मंत्राचा जप करावा. त्यानंतर दुर्गा मातेचं पूजन करावं. पूजेमध्ये मातेला १० फळं अर्पण करावेत. त्यानंतर ही फळे गरीबांमध्ये वाटावीत. काही काळातच तुमच्या जीवनातील अडथळे दूर व्हायला लागतील.

दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षाचं अवश्य दर्शन करावं. असं केल्याने जीवनामध्ये खूप सुख-समृद्धी येते. तसेच शत्रूवर विजय मिळतो. नीलकंठ पक्षाचं दर्शन शुभ मानलं जातं.

दसऱ्याच्या दिवशी पिवळ्या कपड्यामध्ये एक नारळ गुंडाळून जानवे आणि मिठाईसोबत मंदिरात दान करावा. त्यामुळे व्यापारात होत असलेला तोटा नियंत्रणात येईल आणि नफा वाढेल.