त्वचेचं सौंदर्य टिकवण्यासाठी 'हे' पदार्थ करतात मदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 07:59 PM2018-11-27T19:59:52+5:302018-11-27T20:10:11+5:30

हिवाळ्यामध्ये त्वचा शुष्क आणि सावळी दिसू नये म्हणून महिला अनेक कॉस्मॅटिक्स प्रोडक्ट्सचा वापर करतात. किंवा वेगवेगळ्या स्किन ट्रिटमेंट करतात. पण या ट्रिटमेंट महाग असण्यासोबतच केमिकलयुक्त असतात. कालांतराने याचे अनेक साइड-इफेक्ट्सही होतात. अशातच आम्ही तुम्हाला काही हेल्दी फूड्सबाबत सांगणार आहोत. जे आरोग्य चांगलं राखण्यासोबतच त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी आणि उजळवण्यासाठी मदत करतात.

दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया, व्हिटॅमिन्स, अॅन्टी-बॅक्टेरिअल आणि इतर अन्य पोषक तत्व असतात. ही सर्व तत्व त्वचेचं आरोग्य आणि तरूण्य जपण्यासाठी मदत करतात. दररोज एक वाटी दह्याचे सेवन केल्यामुळे त्वचा डिटॉक्स होण्यास उपयोग होतो.

एवोकाडो व्हिटॅमिन ए, डी आणि ई चा उत्तम स्त्रोत आहे. स्किन हायड्रेट ठेवण्याठी एवोकाडो मदत करतं. त्याचबरोबर यामध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट गुण असतात. ज्यामुळे त्वचेतील कोलेजनची पातळी वाढते आणि अॅन्टी-एजिंगची समस्या दूर होते.

टोफूमध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन ई आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळए त्वचेमध्ये नवीन सेल्स तयार होतात. टोफूमुळे स्किनमधील कोलेजनची पातळी वाढण्यास मदत होते.

निरोगी आणि सुंदर त्वचेसाठी डाएटमध्ये बेरीजचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. स्ट्रॉबेरी, रासबेरी, ब्ल्यूबेरी यांसारख्या बेरीज उपयुक्त ठरतात.

टॉमेटो कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. त्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए आणि लायकोपिन यांसारखी तत्व असतात.

अॅन्टी-ऑक्सिडंट गुणधर्म मुबलक प्रमाणात असल्यामुळे ग्रीन-टीचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. तसेच त्वचेला उजाळा मिळण्यासही मदत होते.

आपल्या ब्युटी डाएटमध्ये सुर्यफुलाच्या बीया, भोपळ्याच्या बीयांचा आहारात समावेश करा. यामध्ये व्हिटॅमिन आणि सेलेनियम असल्यामुळे त्वचा चमकदार होते.

ब्रोकलीमध्ये व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे चेहऱ्याची त्वचा उजळण्यासाठी मदत होते. याव्यतिरिक्त ब्रोकलीमध्ये फोलिक अॅसिड आणि बीटा कॅराटीन असतं. जे स्किन डिटॉक्सीफाय करण्यासाठी उपयोगी ठरतात.

वॉटरक्रेसच्या पानांमध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचेचा सावळा रंग दूर होतो. त्याचबरोबर कॅल्शिअम आणि मिनरल्स त्वचा उजळवण्यास आणि डाग कमी करण्यासाठी मदत करतात.