लॉन्च होताच ग्राहकांची पसंती; नवीन Hyundai Creta चे 51 हजार बुकिंग, जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 04:34 PM2024-02-06T16:34:17+5:302024-02-06T16:43:38+5:30

गेल्या महिन्यात बहुचर्चित Hyundai Creta फेसलिफ्ट लॉन्च झाली आहे.

2024 Hyundai Creta Booking: गेल्या महिन्यात (जानेवारी 2024) आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी ह्युंदाईने आपली बहुचर्चित Hyundai Creta फेसलिफ्ट लॉन्च केली.

लॉन्च होताच या गाडीला ग्राहकांची मोठी पसंती मिळाली. आतापर्यंत 51,000 पेक्षा जास्त बुकिंग या गाडीला मिळाले आहेत. ही नवीन SUV 3 इंजिन पर्यायांसह 7 ट्रिममध्ये उपलब्ध आहे.

यात 1.5L टर्बो पेट्रोल (160bhp), 1.5L पेट्रोल (115bhp) आणि 1.5L डिझेल (116bhp) चा समावेश आहे. शिवाय, याचे नवीन टर्बो-पेट्रोल इंजिन फक्त टॉप-एंड SX (O) व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, ज्याची किंमत 20 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

याच्या 1.5 लिटर पेट्रोल NA मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 11 लाख ते 17.24 लाख रुपये आहे, तर पेट्रोल-CVT S(O), SX Tech आणि SX(O) व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 15.82 लाख रु., 17.45 लाख रु. आणि रु. 18.7 लाख रु. आहे.

डिझेल मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटच्या किंमती अनुक्रमे 12.45 लाख आणि 17.32 लाख रुपयांपासून सुरू होतात. या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत.

Hyundai त्यांची स्पोर्टियर N Line व्हर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, जे फेब्रुवारी किंवा मार्च 2024 मध्ये बाजारात येण्याची अपेक्षा आहे. Hyundai Creta N Line ला N Line-स्पेसिफिक कॉस्मेटिक अपग्रेड आणि ट्यून्ड सस्पेंशन सेटअप मिळेल.

लीक झालेल्या पेटंट फोटोमध्ये वेगळ्या पद्धतीने डिझाइन केलेले फ्रंट ग्रिल आणि बंपर दिसत आहे. याशिवाय, यात नवीन 18-इंच अलॉय व्हील्स आणि अपडेट साइड स्कर्टवर एन लाइन ब्रँडिंग असेल.

Creta N-Line मध्ये 160bhp, 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन आणि DCT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असू शकतो. मॅन्युअल ट्रान्समिशन पर्यायाचीही शक्यता आहे.