Car Loan Tips : कार लोनवरील संपूर्ण व्याज होईल 'माफ'! फक्त करा एवढं एक काम; फार कमी लोकांना माहीत आहे हा जुगाड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 09:51 AM2022-12-12T09:51:50+5:302022-12-12T10:04:36+5:30

बरेचसे लोक कार लोन घेऊन कार खरेदी करताना दिसतात. ज्याचा ईएमआय दर महिन्याला भरावा लागतो. हे लोन ज्या कोणत्या बँकेकडून घेतले जाते, ती बँक या लोनवर व्याज लावत असते...

एखादी कार खरेदी करणे ही एक मोठी गोष्ट आहे. आपल्याला बरेचसे लोक कार लोन घेऊन कार खरेदी करताना दिसतात. ज्याचा ईएमआय दर महिन्याला भरावा लागतो. हे लोन ज्या कोणत्या बँकेकडून घेतले जाते, ती बँक या लोनवर व्याज आकारते. अर्थात आपण दर महिन्याला भरत असलेल्या ईएमआयमध्ये मुद्दल रक्कम आणि व्याज या दोहोंचाही समावेश असतो.

खरे तर, आपल्याला बिनव्याजी कार लोन घ्यायचे असेल, तर ते शक्य नाही. मात्र, आपण एक खास ट्रिक वापरून हे नक्की करू शकता. आपल्याला कर्जावर जेवढे व्याज द्यावे लागत आहे, तेवढी रक्कम आपल्याकडे कुठून तरी दुसऱ्या मार्गाने यायला हवी. जेणेकरून, जेवढे पैसे व्याजाच्या स्वरुपात गेले, तेवढेच परतही आले, असे आपल्याला वाटेल. तर जाणून घेऊयात आपण हे कसे करू शकता.

कार लोन आणि व्याज - गृहित धरा, की आपण एखादी कार विकत घेण्यासाठी 500000 रुपये एवढे कार लोन घेतले आहे. हे लोन आपण पाच वर्षांसाठी घेतले आहे. यावर बँक 8 टक्के एवढे व्याज घेत आहे. खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेच्या लोन कॅलक्युलेटरप्रमाणे, वरील प्रमाणे 500000 रुपये एवढे कार लोन घेतल्यास आपल्याला एकूण 1,08,292 रुपये एवढे व्याज द्यावे लागेल.

या कार लोनच्या परतफेडीसाठी आपल्याला जवळपास 10,138 रुपये एवढा EMI भरावा लागेल. अर्थात हे लोन चुकविण्यासाठी आपल्याला दर महिन्याला साधारणपणे 10 हजार रुपयांचा EMI भरावा लागेल. जाणून घ्या पुढे काय...?

SIP मध्ये करा गुंतवणूक - आपण कार लोन सोबतच SIP ही सुरू करा. यात दर महिन्याला गुंतवणूक करत राहा. जर आपण दरमहिन्याला 5000 रुपयांची SIP केली आणि ती 5 वर्षांपर्यंत सुरूच ठेवली, तर आपल्याला आपल्या गुंतवणुकीवर 14 टक्के एवढा परतावा मिळेल (जो दीर्घ मुदतीत सर्वसामान्य आहे).

Groww च्या SIP कॅल्क्युलेटरनुसार, आपल्याला 5 वर्षांमध्ये 1.36 लाख रुपये एवढा परतावा मिळेल. हा परतावा आपण कार लोनवर चुकवत असलेल्या व्याजापेक्षाही जवळपास 28 हजार रुपये अधिक असेल. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, की हे व्याज जोखमेवर अवलंबून असते.

कार लोन सोबतच SIP ही करा - याचाच अर्थ असा की, आपण जेव्हा कार लोन घेता, तेव्हा त्याच्या सोबतच एसआयपीही करायला सुरुवात करा. घेतलेल्या कर्जाच्या रकमेचे आणि SIP च्या रकमेचे कॅल्क्युलेशन करा आणि नंतर तुमच्या SIP मधून मिळणाऱ्या व्याजातून बँकेला द्याव्या लागणाऱ्या व्याजाची भरपाई करा.