धनगर समाजाचा विविध मागण्यांसाठी सोनपेठ तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 05:09 PM2018-08-13T17:09:44+5:302018-08-13T17:11:30+5:30

धनगर जातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी समाज बांधवांनी आज सकाळी तहसीलवर मोर्चा काढला.

For the various demands of Dhangar community, a rally on the Sonpeth tehsil | धनगर समाजाचा विविध मागण्यांसाठी सोनपेठ तहसीलवर मोर्चा

धनगर समाजाचा विविध मागण्यांसाठी सोनपेठ तहसीलवर मोर्चा

Next

सोनपेठ (परभणी ) : धनगर जातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी समाज बांधवांनी आज सकाळी तहसीलवर मोर्चा काढला.

अहिल्याबाई होळकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. येथून निघालेला मोर्चा आंबेडकर चौक, अण्णाभाऊ साठे चौक, शिवाजी चौक मार्गे तहसील कार्यालयवर पोहचला. यानंतर तहसीलदार जिवराज डापकर यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.  

निवेदनाद्वारे महाराष्ट्रातील धनगर जातीला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अहिल्याबाई होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाला दोन हजार कोटीचे अनुदान तात्काळ उपलब्ध करावे, मेंढपाळासाठी प्रत्येक जिल्ह्यात गायरान जमीन राखीव ठेवावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. मोर्चात सुनिल बर्वे, अंगद काकडे, दत्ता पांढरे, सतिश सोन्नर, शाम कसपटे, विरू सोट आदींचा सहभाग होता.    
 

Web Title: For the various demands of Dhangar community, a rally on the Sonpeth tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.