परभणी : शेतकरी उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 12:37 AM2018-06-02T00:37:42+5:302018-06-02T00:37:42+5:30

शेतकऱ्यांना सरसगट पीक कर्ज वाटप सुरु करावे, बोंडअळीची नुकसान भरपाई शेतकºयांच्या खात्यावर जमा करावी, यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शुक्रवारी परभणी, सेलू, पाथरी व मानवत या चार तालुक्यांमध्ये घेराव आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकºयांनी मागण्यांच्या अनुषंगाने प्रशासकीय अधिकाºयांना धारेवर धरले.

Parbhani: Farmers land on the road | परभणी : शेतकरी उतरले रस्त्यावर

परभणी : शेतकरी उतरले रस्त्यावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शेतकऱ्यांना सरसगट पीक कर्ज वाटप सुरु करावे, बोंडअळीची नुकसान भरपाई शेतकºयांच्या खात्यावर जमा करावी, यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शुक्रवारी परभणी, सेलू, पाथरी व मानवत या चार तालुक्यांमध्ये घेराव आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकºयांनी मागण्यांच्या अनुषंगाने प्रशासकीय अधिकाºयांना धारेवर धरले.
सोयाबीन उत्पादक शेतकºयांना पीक विम्यातून हेक्टरी ४२ हजार रुपये देण्यात यावेत, ऊस उत्पादक शेतकºयांना एफआरपी प्रमाणे उसाला दर देऊन थकित देणे तत्काळ द्यावे, साखर आयात बंद करुन निर्यातीला १०० टक्के अनुदान द्यावे, ऊस गाळपाचे नियोजन करावे, दुधाला ६० रुपये प्रमाणे दर देऊन टोनच्या नावाखाली ग्राहकांची होणारी लूट थांबवावी, संपूर्ण शेतकºयांना कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करावा, स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेती मालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा गृहित धरुन हमीभाव द्यावा आदी मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने १ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा कचेरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी घोषणाबाजी केली. या आंदोलनाचे नेतृत्व कॉ.विलास बाबर यांनी केले. आंदोलनात कॉ.अशोक कांबळे, कॉ.विष्णू मोगले, कॉ.सुभाष दिनकर, कॉ.शेख अब्दुल, कॉ.राजेभाऊ राठोड, कॉ.अशोक साखरे, कॉ.ज्ञानेश्वर गिरी, कॉ. अश्रोबा मोगले, कॉ.बाळासाहेब जमरे, कॉ.गंगाधर गवळे, कॉ.ज्ञानोबा हिंगे, कॉ.उद्धव ढगे, कॉ.उत्तम धुमाळ यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मानवत येथे विविध मागण्यांसाठी येथील तहसील कार्यालयात किसान सभा व सुकाणू समितीच्या संयुक्त विद्यमाने घेराव आंदोलन करण्यात आले. शहरातील संत सावता माळी रस्त्यावर असलेल्या माकपच्या संपर्क कार्यालयाजवळ शेतकरी सुकाणू समिती आणि किसान सभेचे पदाधिकारी एकत्र आले होते. हे पदाधिकारी या ठिकाणाहून गाजतवाजत मुख्य रस्त्याने तहसील कार्यालयाजवळ पोहचले. आंदोलनस्थळी झालेल्या सभेत माकपचे तालुका सरचिटणीस लिंबाजी कचरे, सुकाणू समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आळणे, डॉ.जगदीश शिंदे, बाबासाहेब आवचार, अशोक बुरखुंडे, रामप्रसाद कचरे यांची भाषणे झाली. त्यानंतर तहसीलदार नकुल वाघुंडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात रामराजे महाडिक, नारायण आवचार, उद्धव काळे, मतीन अन्सारी, देविदास शिंदे, राजेभाऊ काकडे, विष्णू जाधव, मधुकर आवचार, गणेश शिंदे, वसंत शिंदे, रमेश साठे यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पवार, प्रविण दिनकर यांनी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
पाथरी येथील तहसील कार्यालयात किसान सभेच्या वतीने तीन तास घेराव आंदोलन करण्यात आले. त्यामुळे प्रशासकीय कामकाजही काहीवेळ ठप्प झाले होते. पाथरी येथे अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते सकाळी ११ वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयासमोर जमा झाले. त्यानंतर त्यांनी सेलू कॉर्नरपर्यंत रॅली काढली. येथून ते परत तहसील कार्यालयासमोर आले. येथे त्यांनी प्रवेशद्वारासमोरच ठिय्या मांडला. त्यानंतर जवळपास तीन तास त्यांनी हे आंदोलन केले. त्यानंतर तहसीलदार देविदास शिंदे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी कॉ.दीपक लिपणे, बाळासाहेब गिराम, बळीराम वºहाडे, गोकुळ शिंदे, भागवत कोल्हे, ज्ञानेश्वर शिंदे, सुभाष नखाते, रत्नाकर शिंदे, भारत गायकवाड आदींची उपस्थिती होती.
सेलू- येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सेलू येथे कॉ.रामेश्वर पौळ, दत्तूसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते सकाळी ११ वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयासमोर जमले. यावेळी त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर धरणे आंदोलन करुन तहसीलदार स्वरुप कंकाळ यांना मागण्यांचे निवेदन दिले. आंदोलनात रंगनाथ ताठे, उद्धव पौळ, दगडोबा जोगदंड, मंगलबाई डुकरे, पांडुरंग बोचरे, आबासाहेब आवटे, रोहिदास हातकडके, नारायण पवार, विष्णू चव्हाण, केशव शिंदे, गोविंद पौळ, कारभारी पाते आदी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Parbhani: Farmers land on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.