परभणी जिल्हा; बारा हजार दलघमीचा शाश्वत पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:04 AM2018-06-19T00:04:04+5:302018-06-19T00:04:04+5:30

जलयुक्त शिवार योजनेत मागील वर्षी झालेल्या जलसंधारणाच्या कामातून ११ हजार ९७१ दलघमी शाश्वत पाणीसाठा जमा झाला आहे. उन्हाळ्यातील टंचाई परिस्थितीत हे पाणी जिल्हावासीयांना वापरासाठी मिळणार आहे.

Parbhani district; Sustainable water storage of twelve thousand Dalghmi | परभणी जिल्हा; बारा हजार दलघमीचा शाश्वत पाणीसाठा

परभणी जिल्हा; बारा हजार दलघमीचा शाश्वत पाणीसाठा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जलयुक्त शिवार योजनेत मागील वर्षी झालेल्या जलसंधारणाच्या कामातून ११ हजार ९७१ दलघमी शाश्वत पाणीसाठा जमा झाला आहे. उन्हाळ्यातील टंचाई परिस्थितीत हे पाणी जिल्हावासीयांना वापरासाठी मिळणार आहे.
राज्यातील दुष्काळ कायमस्वरूपी दूर करण्यासाठी राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत २०१६-१७ या वर्षात जिल्ह्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली. प्रशासनाने १३९ कोटी ७५ लाख रुपयांच्या कामांना या वर्षात मंजुरी दिली. साधारणत: ४ हजार ७७१ कामांचे कार्यरंभादेश देण्यात आले. त्यातून ३ हजार ७१६ कामे पूर्ण झाली. शेततळे, सलग समतल चर, ढाळीचे बांध, सिमेंट बंधारे ही कामे झाली. मागील वर्षी पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ३१ टक्के पाऊस कमी झाला असला तरी झालेल्या पावसाचे पाणी बंधाऱ्यात अडल्याने आणि शेततळ्यात चांगला पाणीसाठा झाल्याने बºयापैकी पाणीसाठा झाला. त्यामुळे या उन्हाळ्यात अनेक गावांमध्ये फारसी पाणी टंचाई जाणवली नाही. तसेच भूजल पातळी स्थिर ठेवण्यासही मदतही झाली. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या आढाव्यानुसार मागील वर्षी जिल्ह्यात झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे ११ हजार ९७१ दलघमी पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यामध्ये हा पाणीसाठा टंचाईवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
२६ कोटी रुपयांचा खर्च
जिल्ह्यात मागील वर्षी जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या कामांवर २६ कोटी ९ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. या खचार्तून १२ हजार दलघमी शाश्वत पाणी मिळत असेल तर ती जिल्ह्यासाठी मोठी उपलब्धी ठरत आहे. शेततळे, बंधाºयात साठलेले पाणी उन्हाळ्यात ग्रामस्थांना उपयोगात येत असेल तर जलयुक्तची कामे आणखी गांभीर्याने करण्याची गरज आहे. सध्या या योजनेत बनावट कामे होत असल्याच्याही तक्रारी आहेत. काही गावात प्रत्यक्षात कामे सुरू नसताना कामे झाल्याचे दाखविले जाते. तेव्हा चांगल्या योजनेतही भ्रष्ट्राचार झिरपत असेल तर जिल्ह्याची दुष्काळाची परिस्थिती बदलण्यास बराच वेळ लागेल. तेव्हा प्रशासनाने जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे.
वर्षभरात झालेली कामे व जलसाठा
तालुका झालेली कामे उपलब्ध जलसाठा
सेलू ४४८ १,९८९
जिंतूर ८०० ९९३
परभणी ५१३ १४२९
मानवत ३८९ ६७३
पाथरी २५४ २५५
सोनपेठ १९८ १,१६१
गंगाखेड ५५५ ४७७१
पालम १७५ ६३७
पूर्णा २४९ ६३
एकूण ३६१७ ११९७१

Web Title: Parbhani district; Sustainable water storage of twelve thousand Dalghmi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.