परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन कोटी रुपयांची मशीन धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:13 AM2018-06-17T00:13:15+5:302018-06-17T00:13:15+5:30

जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी विभागात रुग्णांच्या रक्त चाचण्यांसाठी तब्बल दोन कोटी रुपये खर्च करुन राज्य शासनाने अ‍ॅटोमॅटिक ईलायझा मशीन उपलब्ध करुन दिली असताना केवळ कीट अभावी ही मशिन दोन वर्षापासून धूळखात पडून आहे.

At the Parbhani District General Hospital, the machine worth 2 crore rupees consumes dust | परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन कोटी रुपयांची मशीन धूळ खात

परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन कोटी रुपयांची मशीन धूळ खात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी विभागात रुग्णांच्या रक्त चाचण्यांसाठी तब्बल दोन कोटी रुपये खर्च करुन राज्य शासनाने अ‍ॅटोमॅटिक ईलायझा मशीन उपलब्ध करुन दिली असताना केवळ कीट अभावी ही मशिन दोन वर्षापासून धूळखात पडून आहे.
परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यासह परजिल्ह्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येतात. मराठवाड्यातील जिल्ह्याच्या ठिकाणचे हे सर्वात मोठे रुग्णालय म्हणून ओळखले जाते. या जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याचा मानस राज्य शासनाचा आहे. रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्याच्या रक्त चाचण्या करुन अहवाल येण्यासाठी अधिक वेळ लागतो. एखाद्या रुग्णाला तातडीच्या उपचाराची गरज असते. मात्र रक्त चाचणीच्या अहवालामुळे त्या रुग्णावरील उपचारास विलंब होतो. परिणामी अनेक रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. रक्त चाचण्यांच्या अहवालामुळे रुग्णांवर उपचारासाठी विलंब होऊ नये, यासाठी राज्य शासनाने २०१६ मध्ये तब्बल २ कोटी रुपये खर्च करुन अ‍ॅटोमॅटिक ईलायझा मशीन खरेदी करुन जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये उपलब्ध करुन दिली. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या मलेरिया, कावीळ बी, कावीळ सी, एचआयव्ही यासह गुप्त रोग चाचण्या वेळेत पूर्ण होऊन मशीनमधून येणाºया अहवालानुसार डॉक्टरांना उपचार करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा रुग्णांसह डॉक्टरांना होती. मात्र येथील जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे गेल्या दोन वर्षापासून या मॅशीनची पॅकिंगच उघडलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक रुग्णांना अत्याधुनिक मशीनद्वारे उपचाराला मुकावे लागत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने लक्ष देऊन अ‍ॅटोमॅटिक ईलायझा मशीन तत्काळ कार्यान्वित करुन रुग्णांसाठी उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी रुग्णांमधून होत आहे.
लोकप्रतिनिधींचे झाले दुर्लक्ष
जिल्हा सामान्य रुग्णालयात सीटी स्कॅन, एक्स-रे मशीन, औषधींचा तुटवडा, डॉक्टरांचे रुग्णांकडे होणारे दुर्लक्ष, रुग्णालय परिसरातील सुविधा आदी समस्या गेल्या अनेक महिन्यांपासून निर्माण झाल्या आहेत. मात्र या समस्या सोडविण्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. त्यातच गेल्या दोन वर्षापासून मलेरिया, कावीळ बी, कावीळ सी , एडस् व गुप्तरोग या महत्त्वाच्या रक्तचाचण्यांसाठी असलेली अ‍ॅटोमॅटिक ईलायझा मशीन धूळखात पडून आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचे लक्षच गेले नाही. लोकप्रतिनिधींबरोबरच प्रशासनाचाही याकडे कानाडोळा झाला आहे.
केवळ कीट अभावी बंद आहे मशीन
जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी विभागात कोट्यवधी रुपये खर्च करुन उपलब्ध करुन दिलेल्या मशीनला कीटची आवश्यकता असते. ती कीटच मशिन सोबत उपलब्ध करुन दिली नाही. त्यामुळे ही मशिन सुरू होऊ शकली नाही. मशिनसाठी आवश्यक असलेले कीट मिळावे, यासाठी आरोग्य विभागाकडे अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला. मात्र कीट उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून केवळ कीट अभावी ही मशीन बंद आहे. वरिष्ठस्तरावरुन या मशीनसाठी लागणाºया कीट उपलब्ध झाल्यास तत्काळ मशीन कार्यान्वित करण्यात येईल, असे रक्तपेढी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
मेट्रो ब्लड बँकेचा वापर बेडसाठीच
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात २०११ मध्ये मेट्रो रक्तपेढीच्या इमारत उभारणीचे काम सुरु करण्यात आले होते. त्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन २०१७ मध्ये या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या इमारतीच्या उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. उद्घाटन झाल्यानंतर रुग्णांच्या सोयीसाठी या इमारतीचा वापर होईल, अशी अपेक्षा रुग्णांना होती. मात्र या ब्लड बँकेचे उद्घाटन होऊनही मुख्य दरवाजा आजही बंद आहे. मोठ्या थाटामाटात उद्घाटन करुन मेट्रो ब्लड बँकचा वापर केवळ रक्तदानासाठीच केला जात आहे.

Web Title: At the Parbhani District General Hospital, the machine worth 2 crore rupees consumes dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.