हे खेळाडू "T-20"त ठरले हिरो पण "IPL" मध्ये झीरो

By admin | Published: April 3, 2017 04:15 PM2017-04-03T16:15:37+5:302017-04-03T16:22:46+5:30

पाच तारखेपासून आयपीएलच्या दहाव्या रणसंग्रामाला सुरुवात होत आहे. 2००८पासून सुरू झालेल्या या महत्त्वाकांक्षी स्पर्धेने अनेक खेळाडूंच्या स्वप्नांचीही पूर्ती केली आहे.

These players proved to be the "T-20" hero but zero in "IPL" | हे खेळाडू "T-20"त ठरले हिरो पण "IPL" मध्ये झीरो

हे खेळाडू "T-20"त ठरले हिरो पण "IPL" मध्ये झीरो

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - पाच तारखेपासून आयपीएलच्या दहाव्या रणसंग्रामाला सुरुवात होत आहे. 2००८पासून सुरू झालेल्या या महत्त्वाकांक्षी स्पर्धेने अनेक खेळाडूंच्या स्वप्नांचीही पूर्ती केली आहे. या स्पर्धेत खेळल्यामुळे मिळणाऱ्या पैशातून त्यांचे जीवनमान बदलले आहे. टुमदार घर, गाडी आणि आर्थिक सुबत्ता या महत्त्वाच्या गोष्टी उदयोन्मुख खेळाडूंना आयपीएलमुळेच मिळाल्या. आयपीएलमुळे अनेक खेळाडूंना आतरराष्ट्रीय स्तारावर खेळण्यास संधी मिळाली. नव्या उद्योनमुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूसोबत खेळता आले. आयपीएल हा असा एक क्रिकेट फॉरमॅट आहे ज्यामध्ये खेळणारा क्रिकेटर हा केवळ एका मॅचमध्येही स्टार हिरो बनतो तर कुणी क्षणातच झिरोही बनतो. आयपीएलमध्ये असे काही खेळाडू आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भरघोस यश मिळाले पण आयपीएलमध्ये त्यांना सपशेल अपयश आले. तर जाणून घेऊयात अशाच काही खेळाडूसंदर्भात जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हिरो आहेत मात्र, आयपीएलमध्ये त्यांची कामगिरी झिरो राहीली आहे.

- युवराज
षटकार किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या या अष्टपैलू खेळाडून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. एका षटकात सहा षटकार मारण्याचे धाडस या खेळाडूने केले आहे. भारताला वर्ल्डकप जिंकूण देण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे. पण हा सिंह आयपीएलमध्ये अपयशी ठरलेला दिसून आला. आतापर्यंच युवराज पाच संघातून खेळला आहे. आयपीएलच्या इतिहासातील युवराज सर्वात महागडा खेळाडू आहे. 2014 मध्ये त्याच्यासोबत 16 कोटी रुपयाचा करार झाला होता. पण त्याची कामगिरी मात्र साधारण राहिली. त्यामुळे आता आयपीएल 10 च्या मोसमात युवराजला हिरो बणण्याची सुवर्णसंधी मिळालेली आहे

- सौरव गांगुली
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आक्रमक खेळाडू म्हणून गांगुलीला ओळखले जाते. पण सौरव गांगुलीसुद्धा आयपीएलमध्ये फ्लॉप ठरला आहे. आयपीएलच्या पहिल्या मोसमात कोलकाता नाईट रायडर टीमची कमान सांभाळणारा सौरव गांगुली कॅप्टन आणि बॅट्समन म्हणून फ्लॉप ठरला आहे. कोलकाता नंतर पुण्याच्या टीमची कॅप्टनशीप करतानाही सौरव गांगुली काही खास कामगिरी करु शकला नाही.

- मायकल क्लार्क
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज बॅट्समन म्हणून ओळख असलेला मायकल क्लार्कही आयपीएलमध्ये काही खास कामगिरी करु शकला नाही. पुणे संघाचा कर्णधार राहीलेला मायकल क्लार्क आयपीएलमध्ये फ्लॉप ठरला आहे. तसेच बॅट्समन म्हणूनही क्लार्क अयशस्वी राहीला आहे

- कुमार संगाकारा
वर्ल्ड क्रिकेटमधील सुपर बॅट्समन आणि विकेटकिपर कुमार संगाकारा सुद्धा आयपीएलमध्ये सुपर फ्लॉप ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रन्सचा धमाका करणारा संगाकारा आयपीएलमध्ये काही खास कामगिरी करु शकलेला नाहीये. कदाचित यामुळेच संगाकाराला आयपीएल 10 च्या मोसमात संधी मिळू शकलेली नाहीये.

- तिलकरत्ने दिलशान
श्रीलंकेच्या क्रिकेट टीममधील सर्वात आक्रमक बॅट्समनपैकी एक म्हणजेच दिलशान तिलकरत्ने सुद्धा आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करु शकला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलेल्या दिलशानने अपेक्षेनुसार कामगिरी केलेली नाही.

यासारखीच अनेक नावे घेता येतील, यामध्ये आरपी सिंग, इरफान पठाण, व्हिटोरी, पीटरसन, आमला आणि फ्लेमींग

Web Title: These players proved to be the "T-20" hero but zero in "IPL"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.