IPL 10 - मुंबई चौथ्यांदा अंतिम फेरीत

By admin | Published: May 20, 2017 08:48 AM2017-05-20T08:48:43+5:302017-05-20T08:48:43+5:30

आयपीएल १० मधील सर्वोत्तम विजय मुंबई इंडियन्सने क्वालिफायर २ मध्ये नोंदवला. या विजयासोबतच मुंबईचा संघ अंतिम फेरीत पोहचला आहे.

IPL 10 - Mumbai fourth in the final | IPL 10 - मुंबई चौथ्यांदा अंतिम फेरीत

IPL 10 - मुंबई चौथ्यांदा अंतिम फेरीत

Next
style="text-align: justify;">ऑनलाईन लोकमत
मुंबई, दि. 20 - आयपीएल १० मधील सर्वोत्तम विजय मुंबई इंडियन्सने क्वालिफायर २ मध्ये नोंदवला. या विजयासोबतच मुंबईचा संघ अंतिम फेरीत पोहचला आहे. मुंबईने आयपीएलच्या इतिहासात चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात आयपीएलमध्ये आपला दबदबा राखणा-या मुंबई इंडियन्सने तुल्यबळ केकेआरला गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर पराभूत केले. 
मुंबईने अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंहला विश्रांती देत कर्ण शर्मा आणि कृणाल पांड्या यांच्याकडे फिरकीची धुरा दिली. कर्ण शर्माने आपले सर्वोत्तम प्रदर्शन या सामन्यात केले. त्याने ४ षटकांत १६ धावा देत चार गडी बाद केले. तर डेथ ओव्हर स्पेशलीस्ट जसप्रीत बुमराहने पॉवरप्ले मध्ये निर्धाव षटक टाकत तीन गडी बाद केले. 
 
जॉन्सनने २ तर मलिंगाने १ गडी बाद केला. गोलंदांजांच्या भेदक माºयापुढे केकेआरने शरणागती पत्करली. केकेआरकडून इशांक जग्गी आणि सुर्यकुमार यादव यांनी ५६ धावांची भागिदारी करत संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठी धावसंख्या केकेआरला उभारता आली नाही.
कर्ण शर्माची दमदार कामगिरी पाहता केकेआरने त्यांचा फिरकीपटू पियुष चावला याला लवकर गोलंदाजीला बोलावले. चावलाने सिमन्स आणि अंबाती रायडू या स्फोटक फलंदाजांना बाद करत मुंबईला अडचणीत आणले.  यादवने पार्थिवला बाद करत मुंबईला बॅकफुटवर ढककले. मात्र मोठे आव्हान नसल्याने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलु कृणाल पांड्या यांनी मुंबईचा विजयपथ तयार केला.
मुंबई विजयाच्या जवळ असताना रोहित शर्मा फटकेबाजीच्या नादात बाद झाला. मात्र किरेन पोलार्ड आणि कृणाल यांनी संघाला विजय मिळवून दिला. रोहित शर्माने आयपीएलच्या सर्व सत्रात मिळून केकेआर विरोधात ७०० धावा फटकावल्या आहेत. केकेआर विरोधात एवढ्या धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. एखाद्या संघा विरोधात सर्वात जास्त धावा करण्याच्या यादी गेल  अव्वल आहे.
त्याने पंजाब विरोधात ७९७ धावा केल्या आहेत. तर रैनाने मुंबई विरोधात ७०७ आणि केकेआर विरोधात ७०१ धावा केल्या आहेत. कोहलीने सीएसके विरोधात ७०६ धावा केल्या आहेत. ४/१६ ही कर्ण शर्माची आतापर्यंची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने केकेआर विरोधात नेहमीच चांगली कामगिरी केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्याने केकेआर विरोधात आतापर्यंत १० सामन्यात १४ बळी घेतले आहेत.

Web Title: IPL 10 - Mumbai fourth in the final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.