क्रिकेट, कबड्डीनंतर आता दोन कुस्ती लीग, दोन मराठी वाहिन्या आखाड्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 11:36 AM2018-09-08T11:36:37+5:302018-09-08T11:36:58+5:30

महाराष्ट्रातील कुस्ती आणि कुस्तीपटू यांना आता 'अच्छे दिन' आले आहेत असे म्हणायला हरकत नाही. राहुल आवारे याने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केल्यानंतर तर महाराष्ट्रातील कुस्तीपटू आंतरराष्ट्रीय स्पर्धांबाबत गांभीर्याने विचार करू लागले आहेत.

After the cricket and kabaddi, now two wrestling leagues | क्रिकेट, कबड्डीनंतर आता दोन कुस्ती लीग, दोन मराठी वाहिन्या आखाड्यात

क्रिकेट, कबड्डीनंतर आता दोन कुस्ती लीग, दोन मराठी वाहिन्या आखाड्यात

Next

मुंबई : महाराष्ट्रातील कुस्ती आणि कुस्तीपटू यांना आता 'अच्छे दिन' आले आहेत असे म्हणायला हरकत नाही. राहुल आवारे याने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केल्यानंतर तर महाराष्ट्रातील कुस्तीपटू आंतरराष्ट्रीय स्पर्धांबाबत गांभीर्याने विचार करू लागले आहेत. महाराष्ट्र केसरी आणि फारफार तर हिंद केसरी इथवरच विचार करणारा आणि त्यानंतर सरकारकडून नोकरी मिळवून लाइफ सेट अस समजणारा राज्यातील कुस्तीपटू सुजाण झाला आहे. हीच बाब हेरून महाराष्ट्रातील कुस्ती आखाड्यांत मराठीतील दोन प्रमुख वाहिन्या उतरल्या आहेत. आता टीआरपीच गणित सर करण्यासाठी त्यांच्यातही कुस्तीचे डावपेच रंगतील हे वेगळे सांगायला नको, परंतु त्यातून खेळाडूंच भले व्हावे ही इच्छा..
कलर्स मराठीची ' कुस्ती चॅम्पियन्स लीग'
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या मान्यतेने ‘कुस्ती चॅम्पियन्स लीग’चे आयोजन करण्यात आले आहे. ७ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर या कालावधीत ही लीग पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर होणार आहे. महाराष्ट्रातल्या सहा शहरांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सहा टीम या लीगमध्ये असणार आहेत. एकूण ७२ खेळाडू खेळणार आहेत. प्रत्येक टीममध्ये ८ मुले आणि ४ मुली असे १२ खेळाडू सहभागी होतील. महाराष्ट्रभरातील ३०० खेळाडूंमधून लिलावाच्या माध्यमातून या ७२ खेळाडूंची निवड करण्यात येईल. या लीगमध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांच्या टीमचा समावेश असेल. 



झी टॉकीजची 'महाराष्ट्र कुस्ती लीग' 
'झी महाराष्ट्र कुस्ती लीग'मध्ये राहुल आवारे, किरण भगत, प्रसाद सस्ते, ज्योतिबा अटकळे, अक्षय शिंदे, वसंत सरवदे, सोनबा गोंगणे, शिवराज राक्षे, गणेश जगताप, उत्कर्ष काळे, रणजीत नलावडे या दिग्गज खेळाडूंचा सहभाग असणार आहे. २ ते १८ नोव्हेंबर पर्यंत बालेवाडी स्टेडियम पुणे इथे रंगणार आहे. पण या लीगला महाराष्ट्र कुस्ती संघटनेची मान्यता आहे की नाही याबाबत संभ्रम आहे. 

Web Title: After the cricket and kabaddi, now two wrestling leagues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.