पंचतारांकित हॉटेल्ससाठी जागतिक निविदा, सिडकोचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 06:53 AM2018-01-05T06:53:48+5:302018-01-05T06:54:00+5:30

सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी २0१९ ची डेडलाइन निर्धारित केली आहे. त्यादृष्टीने कामाला गतीही दिली आहे. प्रकल्पपूर्व कामे सुरू करण्यात आली आहेत. ही कामे सुरू करतानाच विमानतळ परिसरात पंचतारांकित हॉटेल्सचा प्रस्तावही सिडकोने तयार केला आहे. त्यानुसार लवकरच चार हॉटेल्ससाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.

 World bid for five-star hotels, CIDCO decision | पंचतारांकित हॉटेल्ससाठी जागतिक निविदा, सिडकोचा निर्णय

पंचतारांकित हॉटेल्ससाठी जागतिक निविदा, सिडकोचा निर्णय

Next

- कमलाकर कांबळे
नवी मुंबई -  सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी २0१९ ची डेडलाइन निर्धारित केली आहे. त्यादृष्टीने कामाला गतीही दिली आहे. प्रकल्पपूर्व कामे सुरू करण्यात आली आहेत. ही कामे सुरू करतानाच विमानतळ परिसरात पंचतारांकित हॉटेल्सचा प्रस्तावही सिडकोने तयार केला आहे. त्यानुसार लवकरच चार हॉटेल्ससाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सुमारे १६ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. अलीकडेच विमानतळ उभारणीची आर्थिक निविदाही निश्चित करण्यात आली. त्यानुसार जीव्हीके कंपनीला विमानतळ उभारणीचा ठेका देण्यात आला आहे. तसेच भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. विमानतळाच्या गाभा क्षेत्रात येणाºया दहा गावांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच उलवे टेकडीची उंची कमी करणे, नदीचा प्रवाह बदलणे, उच्च दाबाच्या उपºया विद्युत वाहिन्या भूमिगत करणे, विमानतळ गाभा क्षेत्राचे सपाटीकरण आदी सुमारे दोन हजार कोटी रुपयांची प्रकल्पपूर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळाला आवश्यक असणाºया सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सिडकोने पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून या क्षेत्रात जागतिक दर्जाचे पंचतारांकित हॉटेल्स उभारण्याची सिडकोची कल्पना आहे. त्यासाठी आवश्यक तितके भूखंड आरक्षित करून ठेवले आहेत. या भूखंडांवर पंचतारांकित हॉटेल्स उभारण्यासाठी जागतिक स्तरावर निविदा काढून इच्छुक कंपन्यांना निमंत्रित केले जाणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी सांगितले.
नवी मुंबई विमानतळावरून वर्षाला पाच ते साडेपाच कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात दरवर्षी एक कोटी प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रीनफिल्ड विमानतळ असल्याने मुंबई विमानतळावरील ताण कमी होणार आहे. देश-विदेशातील प्रवाशांना नवी मुंबई विमानतळावरून प्रवास करावा लागणार आहे. त्याअनुषंगाने विमानतळ परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने पंचतारांकित हॉटेल्सचा समावेश आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण होण्यास दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लागणार आहे. तत्पूर्वी पंचतारांकित हॉटेल्सचे नियोजन होणे आवश्यक असल्याने सिडकोने त्यादृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे.

हॉटेलसाठी ३५ भूखंड आरक्षित
देश-विदेशातून येणाºया प्रवाशांना, उद्योजकांना विमानतळ परिसरातच निवासाची सोय असणे अपेक्षित असते. त्यानुसार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात अंतरा-अंतराने वीस ते पंचवीस पंचतारांकित हॉटेल्स आहेत. अनेकदा तांत्रिक कारणांमुळे विमानाचे उड्डाण रद्द होते. अशावेळी परदेशी प्रवाशांना तासन्तास विमानतळावर बसून राहणे शक्य होत नाही. विमानतळ परिसरात असणारी पंचतारांकित हॉटेल्स या परिस्थितीत उपयुक्त ठरतात. या पार्श्वभूमीवर सिडकोने नवी मुंबई विमानतळ परिसरात पंचतारांकित हॉटेल्ससाठी ३0 ते ३५ भूखंड आरक्षित ठेवले आहेत.

Web Title:  World bid for five-star hotels, CIDCO decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.