बावखळेश्वर मंदिर आज जमीनदोस्त होणार, जमावबंदी आदेश जारी, परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 05:11 AM2017-12-14T05:11:31+5:302017-12-14T05:11:42+5:30

एमआयडीसीमधील बावखळेश्वरसह तिन्ही मंदिरांवर एमआयडीसी गुरुवारी कारवाई करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून येथील १ लाख ३२ हजार ९६५ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात येणार आहे.

The temple of Babavleshwar temple will be demolished today | बावखळेश्वर मंदिर आज जमीनदोस्त होणार, जमावबंदी आदेश जारी, परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप

बावखळेश्वर मंदिर आज जमीनदोस्त होणार, जमावबंदी आदेश जारी, परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप

Next

नवी मुंबई : एमआयडीसीमधील बावखळेश्वरसह तिन्ही मंदिरांवर एमआयडीसी गुरुवारी कारवाई करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून येथील १ लाख ३२ हजार ९६५ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात येणार आहे. या दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी परिसरामध्ये जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे.
औद्योगिक वसाहतीच्या जागेवर अतिक्रमण करून बावखळेश्वर, गणेश व महाकाली मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते. याशिवाय परिसरामध्ये तलावाचे सुशोभीकरण, नारळाची बाग व कार्यालय उभारण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी २०१३मध्ये याविषयी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. जुलै २०१३मध्ये उच्च न्यायालयाने बावखळेश्वर मंदिरासह सीबीडी बेलापूरमधील ग्लास हाउस परिसर अनधिकृत ठरवून त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. सर्वोच्च न्यायालयानेही मंदिर अनधिकृत ठरवून त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. कारवाई न केल्यामुळे प्रशासनाला धारेवर धरले होते. याप्रकरणी कारवाई केली नाही तर अधिकाºयांवरच कारवाई करण्याचा इशारा दिला होता. यामुळे एमआयडीसी प्रशासनाने कारवाईसाठी पोलिसांकडे बंदोबस्त मागितला होता. १३ व १४ डिसेंबरला पोलिसांनी बंदोबस्त दिला असून या परिसरामध्ये जमाबंदी आदेश जारी केला आहे. सहायक पोलीस आयुक्त किरण पाटील यांनी १फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १४४प्रमाणे हा आदेश जारी केला आहे. नवी मुंबई महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ टीटीसी मधील पावणे भागात भूखंड क्रमांक १२ या भूखंडावर बावखळेश्वर मंदिर पक्क्या स्वरूपात बांधले आहे. मंदिराचे विश्वस्त सतीश पाटील व संतोष तांडेल यांनी एमआयडीसी कार्यालयास दिलेल्या पत्रावरून त्यांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेली नाही. एमआयडीसीच्या रजिस्ट्री अस्तित्वात असल्याबाबत एमआयडीसीकडे किंवा पोलीस ठाण्याकडे कोणतीही नोंद नाही. सदरच्या ठिकाणी एकूण तीन मंदिरे असून ते २००९मध्ये बांधण्यात आली आहेत. ही मंदिरे पुरातन नाहीत. एमआयडीसीची १००३५ चौरस मीटर क्षेत्रफळावर तीन मंदिरे आहेत. मंदिराला लागून एकूण १ लाख ३२ हजार ९६५ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. या अतिक्रमणांविरोधात जुलै २०१३मध्ये जनहित याचिका दाखल झाली होती. चार वर्षांपासून मंदिरावर कारवाई होणार की नाही, याविषयी तर्क-वितर्क लढविले जात होते. अखेर प्रशासनाने कारवाईचा निर्णय घेतला असून परिसरामध्ये प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कारवाईकडे
शहरवासीयांचे लक्ष
बावखळेश्वर मंदिर व परिसरातील बांधकामावर होणाºया कारवाईकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. या परिसराला राजकीयदृष्ट्याही महत्त्व असल्याने राजकीय नेते व कार्यकर्त्यांचेही याकडे लक्ष लागले आहे. एमआयडीसी प्रशासन काय कारवाई करते. मंदिर वाचविण्यासाठी आंदोलन केले जाणार का? या सर्वांविषयी शहरभर चर्चा सुरू झाली आहे.

पोलिसांनी जारी केलेला मनाई आदेश
- बावळखेश्वर मंदिर परिसराच्या १०० मीटर परिसरामध्ये
१३ व १४ डिसेंबर रोजी मनाई आदेश जारी करण्यात येत आहे
- मंदिर परिसरामध्ये दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे बरोबर घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
- या परिसरामध्ये कोणालाही स्फोटक किंवा दाहक वस्तू घेऊन जाता येणार नाही.
- भाले, तलवारी, काठ्या, बंदुका, देशी कट्टे, रिव्हाल्वर व इतर कोणतीही शस्त्रे सोबत घेऊन जाता येणार नाही.
- कोणत्याही व्यक्तीच्या चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाºयाच्या चित्राचे किंवा प्रतिमांचे दहन करता येणार नाही.
- मंदिर परिसरामध्ये कोणालाही मोठ्या आवाजात किंवा अर्वाच्च भाषेत घोषणाबाजी करता येणार नाही.

Web Title: The temple of Babavleshwar temple will be demolished today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.