पनवेल परिसरात टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 01:32 AM2019-06-04T01:32:13+5:302019-06-04T01:32:22+5:30

नियोजनाचा अभाव असल्याने पनवेलमधील बहुतांशी वसाहतीना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

Tanker water supply in Panvel area | पनवेल परिसरात टँकरने पाणीपुरवठा

पनवेल परिसरात टँकरने पाणीपुरवठा

Next

कळंबोली : पनवेल महापालिका क्षेत्रात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एमजेपीकडून मागणीप्रमाणे पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते. टँकरद्वारे पाणी विकत घेऊन काही सोसायट्यांना आपली तहान भागवावी लागत आहे, त्यामुळे रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

नियोजनाचा अभाव असल्याने पनवेलमधील बहुतांशी वसाहतीना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा, नवीन पनवेल, खांदा कॉलनी येथे सिडको पाणीपुरवठा करते. तेथेही पाण्याची समस्या आहे. देहरंग धरण कोरडे पडल्याने महापालिका पावसाची वाट पाहत आहे. त्यामुळे शहरातसुद्धा पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

सिडको व महापालिकेकडून वसाहतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे सांगितले जात आहे; परंतु टँकरची संख्याही अपुरी असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. महापालिका क्षेत्रात जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट, टीआयपीएल तसेच इतर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मोफत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पंचशिलनगरमधील झोपडपट्टीत टँकर येताच पाणी भरण्याकरिता झुंबड लागली होती.

Web Title: Tanker water supply in Panvel area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी