सर्वपक्षीय खासदारांकडून दिल्लीत शाहू महाराजांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 01:50 AM2018-07-27T01:50:44+5:302018-07-27T03:53:49+5:30

मराठा आरक्षणाचीही मागणी; संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रतिसाद

Greetings from all MPs in Delhi to Shahu Maharaj | सर्वपक्षीय खासदारांकडून दिल्लीत शाहू महाराजांना अभिवादन

सर्वपक्षीय खासदारांकडून दिल्लीत शाहू महाराजांना अभिवादन

googlenewsNext

नवी दिल्ली/कोल्हापूर : आपल्या संस्थानातील मागास समाजाला ११७ वर्षांपूर्वी आरक्षण लागू करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांना गुरुवारी दिल्ली येथे अभिवादन करण्यात आले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वपक्षीय खासदार संसद प्रांगणातील शाहू महाराजांच्या पुतळा परिसरात उपस्थित होते. यावेळी मराठा आरक्षणाचीही मागणी करण्यात आली.
खासदार संभाजीराजे म्हणाले, गेली अनेक वर्षे मराठा समाज आरक्षणासाठी सनदशीर मार्गाने आंदोलने करीत आहे. गेल्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून ५८ मूक मोर्चे काढून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केले गेले. हे मोर्चे अतिशय शांततेत काढून मराठा समाजाने जगासमोर एक आदर्श निर्माण केला होता; परंतु आरक्षणाचा प्रश्न न सुटल्यामुळे समाजाने पुन्हा आंदोलनास सुरुवात केली आहे. आजपर्यंत दोन युवकांनी आत्महत्या केली आहे. पात्रता असूनही आरक्षणाअभावी शिक्षण, नोकºयांमध्ये संधी मिळत नसल्याने या समाजामध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. म्हणूनच तातडीने आरक्षण मिळण्याची गरज आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार धनंजय महाडिक, आनंदराव आडसूळ यांच्यासह अन्य खासदार उपस्थित होते.

महाराष्ट्र सदनात तरुणांचा जथा धडकला
डोक्यावर मराठा मोर्चा लिहिलेल्या भगव्या रंगाच्या टोप्या घातलेल्या २००-२५० तरुणांचा जथा गुरुवारी नवीन महाराष्टÑ सदनात धडकला. एरवी महाराष्टÑ सदनाच्या उपहारगृहात जेवायला जायचे असल्यासही झाडाझडती घेणाºया सुरक्षा रक्षकांनी कुणालाही अडविले नाही.
कस्तुरबा मार्गावरून जय मराठा, ‘एकच मिशन-मराठा आरक्षण’, अशा गगनभेदी घोषणा देत हा जत्था थेट महाराष्टÑ सदनाच्या लॉबीमध्ये घुसला. हे सर्व तरुण करोलबागमध्ये राहत असून त्यांचा सराफा व्यवसाय आहे. महाराष्टÑ सदनाच्या लॉबीमध्ये आंदोलनकर्त्यांच्या घोषणा सुरू असतानाच खा. संभाजीराजे छत्रपती तिथे आलेत. त्यांनी आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार असल्याची ग्वाही दिली.

Web Title: Greetings from all MPs in Delhi to Shahu Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.