Three devotees killed in the crash | कळवणजवळ अपघातात तीन भाविक ठार
कळवणजवळ अपघातात तीन भाविक ठार

कळवण : मजल दरमजल करून चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर पायी जाणाऱ्या भाविकांना खासगी वाहनाने उडवल्याने तीन जण ठार झाल्याची घटना घडली. अपघातातील दोन मृतांची ओळख पटू शकली नव्हती. या घटनेत चार जण जखमी झाले आहेत. कळवणजवळ कोल्हापूर फाटा येथे सोमवारी पहाटे ही घटना घडली.
कळवणहून नांदुरीकडे पायी जात असताना नाशिककडे भरधाव वेगाने जाणाºया खासगी प्रवासी वाहतूक करणाºया क्रूझरने (एमएम १९ सीएफ ०७५१) पादचारी भाविकांना पाठीमागून उडवल्याने शुभम बापू देवरे (१३) रा. गुंजाळनगर (देवळा) या भाविकाचा अंत  झाला.  गंभीर जखमींना नाशिक जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना दोघा अनोळखी भाविकांना मृत्यूने कवटाळले. जखमीना कळवण उपजिल्हा रु ग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नाशिक येथील शासकीय जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले. येथे दोघांचा मृत्यू झाला. अपघाताच्या या घटनेत कल्पेश रविंद्र सूर्यवंशी (२५), भाऊसाहेब पुंडलिक पवार (१५) यांच्यासह ३० ते ३५ वयोगटातील दोन अन्य भावीक जखमी झाले आहे. सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव १३ एप्रिल अर्थांत रामनवमीपासून उत्साहात सुरु झाला असून खान्देशसह महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून देवीभक्त दर्शनासाठी पायी येत आहेत. कळवण शहरातून सप्तशृंग गडाकडे जाण्याचा मार्ग असून देवीभक्त कळवणमार्गे मार्गस्थ होतात. शुभम देवरे हे सहकारी भाविकासह गडाकडे रवाना होत असतांना काळाने त्यांच्यावर झडप घातली. दरम्यान, अपघाताचे वृत्त कळताच घटनास्थळी कळवणचे पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे व पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी भेट देऊन पहाणी केली. या प्रकरणी कळवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ठुमसे तपास करीत आहेत. 


Web Title:  Three devotees killed in the crash
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.