सिन्नरला सहा लाख रुपये लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 04:54 PM2019-03-10T16:54:30+5:302019-03-10T16:54:35+5:30

सिन्नर : शहरातील देना बॅँकेतून पैसे काढून पायी चाललेल्या शेतकऱ्यांच्या हातातील सहा लाखांची रोकड असलेली पिशवी पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पळवल्याची घटना शुक्रवार (दि.८) रोजी दुपारच्या सुमारास घडली. पोलिसांनी तातडीने परिसराची नाकाबंदी करूनही पल्सरचा शोध घेण्याचा प्रस्ताव केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही.

 Sinnar has been fined six lakh rupees | सिन्नरला सहा लाख रुपये लांबविले

सिन्नरला सहा लाख रुपये लांबविले

Next
ठळक मुद्देतालुक्यातील खंबाळे येथील कारभारी आंधळे यांनी घरून दोन लाख रुपये बरोबर आणले होते, तर देना बॅँकेच्या सिन्नर शाखेतून दीडच्या सुमारास त्यांनी चार लाख रुपये काढले.



सिन्नर : शहरातील देना बॅँकेतून पैसे काढून पायी चाललेल्या शेतकऱ्यांच्या हातातील सहा लाखांची रोकड असलेली पिशवी पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पळवल्याची घटना शुक्रवार (दि.८) रोजी दुपारच्या सुमारास घडली. पोलिसांनी तातडीने परिसराची नाकाबंदी करूनही पल्सरचा शोध घेण्याचा प्रस्ताव केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही.
तालुक्यातील खंबाळे येथील कारभारी आंधळे यांनी घरून दोन लाख रुपये बरोबर आणले होते, तर देना बॅँकेच्या सिन्नर शाखेतून दीडच्या सुमारास त्यांनी चार लाख रुपये काढले. ही रक्कम त्यांना आपल्या नाशिकच्या मित्राला जमिनीच्या खरेदीसाठी उसनवार म्हणून द्यायची होती. ही रक्कम नाशिकला घेऊन जाण्यासाठी त्यांचे काही मित्र बॅँकेपासून काही अंतरावर कोंबडा बिडी कारखान्याच्या समोर पुणे महामार्गावर चारचाकीसह थांबलेले होते. आंधळे यांनी बॅँकेतून रक्कम काढून पिशवीत ठेवली व इतर चार मित्रांसह गप्पा मारत ते पुणे महामार्गावरील चारचाकी वाहनाकडे जात होते. महामार्गावर आल्यावर अचानक मारुती मंदिराकडून पल्सर दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या युवकाने आंधळे यांच्या हातातील पैशांची पिशवी हिस्कावून तेथून पळ काढला. क्षणात घडलेल्या या घटनेनंतर पल्सर दुचाकी सुसाट वेगाने जुन्या संगमनेर नाक्याकडे निघून गेली. या पल्सरचा नंबर कोणालाही दिसू शकला नाही. या दुचाकीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न संगमनेर नाक्याकडून पल्सर नेमकी कुठल्या बाजूला गेली हे न समजल्याने आंधळे व त्यांच्या मित्रांना सोडून द्यावा लागला. आंधळे यांनी तातडीने सिन्नर पोलीस ठाण्यात सदर घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने परिसरात नाकाबंदी करून पल्सरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश येऊ शकले नाही. पोलिसांनी बॅँकेतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, आंधळे यांच्यावर पाळत ठेवून कुणी हा प्रकार केला का याचाही तपास करण्यात येत आहे.

Web Title:  Sinnar has been fined six lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.