कळवणला कष्टकºयांच्या सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:26 AM2018-02-20T00:26:08+5:302018-02-20T00:29:10+5:30

कळवण : जय भवानी, जय शिवाजी घोषणांचा जयजयकार, झेंड्यांनी कळवण शहरासह तालुक्यातील गाव, खेडे, पाड्यावरील संपूर्ण परिसरात निर्माण झालेले शिवमय वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली.

Respectful | कळवणला कष्टकºयांच्या सन्मान

कळवणला कष्टकºयांच्या सन्मान

Next
ठळक मुद्देशिवजन्मोत्सव : भगवती प्रतिष्ठानचा उपक्रम; तालुक्यात शिवजयंती उत्साहात

कळवण : जय भवानी, जय शिवाजी घोषणांचा जयजयकार, झेंड्यांनी कळवण शहरासह तालुक्यातील गाव, खेडे, पाड्यावरील संपूर्ण परिसरात निर्माण झालेले शिवमय वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली.
फटाक्यांची आतिषबाजी, रांगोळ्यांची सजावट, लेजीम व टिपरी पथकासह ढोलताशांचा गजर अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहर व तालुक्यात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गावागावातून शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढली.
कळवण, अभोणा, मानूर, पाळे, शिरसमणी, ओतूर, कनाशी भागात शिवभक्तांनी मोटारसायकल रॅली काढली. मोटारसायकलवर लावलेले भगवेध्वज लक्ष वेधून घेत होते. त्यामुळे शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण आल्याचे चित्र कळवण शहर व तालुक्यात यानिमित्ताने दिसून आले. कळवण येथील भगवती प्रतिष्ठानतर्फे बसस्थानक परीसरात आरास तयार करण्यात आली होती. शिवजन्मोत्सवानिमित्ताने भगवती प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील अठरापगड जातीतील कष्टकºयांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भगवती प्रतिष्ठानच्या वतीने शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शहरातील विविध भागात शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. किशोर पगार यांनी सूत्रसंचालन केले.
सायंकाळी ५ वाजता शहरातून निघालेल्या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सकाळी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, कळवण नगरपंचायत गटनेते कौतिक पगार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शहराध्यक्ष जितेंद्र पगार, काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश पगार, शिवसेना शहरप्रमुख साहेबराव पगार व शहरातील मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. मेनरोड मार्गे निघालेल्या मिरवणुकीच्या स्वागताला शिवभक्तांनी दुतर्फा गर्दी केली होती. विविध मंडळांनी मिरवणुकीचे स्वागत केले. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती. कळवण येथील भगवती प्रतिष्ठानने शहरात अनोख्या पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा करत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. भगवती प्रतिष्ठानच्या सदस्यांनी अठरापगड जातीतील कष्टकºयांचा सन्मान केला. सन्मानाची संकल्पना साकारत उपेक्षित घटकांचा सन्मान केला.

Web Title: Respectful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.