कसबेसुकेणे ते पंढरपूर सायकल दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 04:00 PM2019-06-25T16:00:43+5:302019-06-25T16:01:07+5:30

युवकांचा उपक्रम : पर्यावरणाचा देणार संदेश

Kasbeşekane to Pandharpur cycle dindi | कसबेसुकेणे ते पंढरपूर सायकल दिंडी

कसबेसुकेणे ते पंढरपूर सायकल दिंडी

Next
ठळक मुद्देकसबे सुकेणे, लोणी, नगर,करमाळा यामार्गे चार दिवसांचा सुमारे ३५० किलोमीटरचा प्रवास ही दिंडी करणार आहे

कसबे सुकेणे : येथील गडवाट प्रवास सह्याद्रीचा या मंडळाच्या वतीने यंदापासून कसबे सुकेणे ते पंढरपूर सायकल दिंडीचे आयोजन करण्यात आले असून या दिंडीचे प्रस्थान मंगळवारी (दि.२५) पहाटे पंढरपूरच्या दिशेने झाले. या दिंडीत सहभागी युवक पर्यावरणाचा संदेश देणार आहेत.
कसबे सुकेणे येथील स्वर्गीय माधवराव पहिलवान क्र ीडा महोत्सवाचे संस्थापक बाळासाहेब जाधव आणि त्यांचे सहकारी कसबे सुकेणे येथे सातत्याने साहसी खेळ, ट्रेकिंग यासारखे उपक्र म राबवित असतात. याकरिता त्यांनी कसबे सुकेणे येथे गडवाट प्रवास सह्याद्रीचा या मंडळाची स्थापना केलेली आहे. यंदा कसबे सुकेणे येथून त्यांनी पंढरपूर सायकल दिंडीचे आयोजन केले आहे. या दिंडीचे प्रस्थान कसबे सुकेणे येथून झाले. कसबे सुकेणेचे उपसरपंच छगन जाधव, बाळासाहेब जाधव , राजेंद्र भंडारे, महेश मोगल, सुधीर जाधव आदींचा या दिंडीत सहभाग आहे. कसबे सुकेणे, लोणी, नगर,करमाळा यामार्गे चार दिवसांचा सुमारे ३५० किलोमीटरचा प्रवास ही दिंडी करणार आहे. निसर्ग समतोल राखण्यासाठी पर्यावरण अबाधीत ठेवा, प्लास्टिकचा वापर करू नका, जल, वायू, भूमी प्रदूषण टाळा , निसर्गाशी मैत्री करा , पाण्याचा जपून वापर करा , असा संदेश ही सायकल दिंडी देणार असल्याची माहिती छगन जाधव यांनी दिली.

Web Title: Kasbeşekane to Pandharpur cycle dindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.