उत्कृष्ट किल्ले बनविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 05:48 PM2018-12-04T17:48:37+5:302018-12-04T17:48:52+5:30

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालयात दिवाळीच्या सुट्टीमध्ये किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला.

Fine festivals of students making great forts | उत्कृष्ट किल्ले बनविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार

उत्कृष्ट किल्ले बनविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार

Next

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालयात दिवाळीच्या सुट्टीमध्ये किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला.
उपसरपंच शेखर कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्र्यक्रमात ए. टी. शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य डी. एम. आव्हाड, रामदास भोर , सागर भोर, अंकुर काळे, रघुनाथ काकड, प्राचार्य व्ही. एस. कवडे व्यासपीठावर उपस्थित होते
दिवाळीच्या सुट्टीमध्ये किल्ला बनवा स्पर्धेत पार पडली. यात मोठ्या गटातील सिद्धी आमले, वैभवी आमले, आदित्य आमले, हर्षद शिंदे, समृद्धी शिंदे यांचा समावेश होता. तर लहान गटात ऋत्वीजा काळे, ऋग्वेद काळे, नीता शिंदे, अमृता शिंदे आदींचा समावेश होता. दोन्ही गटांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. किल्ले बनवा ही स्पर्धा रामदास भोर, अंकुर काळे ,सागर भोर आदीच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती.

Web Title: Fine festivals of students making great forts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.