लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी थेट जर्मनीहून नाशकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:16 AM2019-04-29T11:16:48+5:302019-04-29T11:28:17+5:30

‘वोट कर नाशिककर’सारख्या अभियानांमार्फत जिल्हा प्रशासनाने तसेच विविध सामाजिक संघटनांनी आणि नेटिझन्स्कडून सोशलमिडियावर सातत्याने मतदानाचे महत्त्व पटवून देत मतदार जनजागृती करण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम आज मतदान केंद्रांवर पहावयास मिळत आहे.

Demand Due to Democracy Right from Germany | लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी थेट जर्मनीहून नाशकात

लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी थेट जर्मनीहून नाशकात

Next
ठळक मुद्दे‘स्मार्ट’ पध्दतीने वोटर हेल्पलाईनचा वापर देशाला बळकट करण्यासाठी मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा,

नाशिक : सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारताचे निवासी होण्याचे कर्तव्य बजावत लोकशाहीने दिलेला मतदानाच हक्क अदा करण्यासाठी थेट जर्मनीहून फुलसे दाम्पत्य नाशकात शुक्रवारी (दि.२६) दाखल झाले. त्यांनी सोमवारी सकाळी इंदिरानगरमधील आपल्या मतदान केंद्रावर हजेरी लावून मतदानाचा हक्क बजावला.
‘वोट कर नाशिककर’सारख्या अभियानांमार्फत जिल्हा प्रशासनाने तसेच विविध सामाजिक संघटनांनी आणि नेटिझन्स्कडून सोशलमिडियावर सातत्याने मतदानाचे महत्त्व पटवून देत मतदार जनजागृती करण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम आज मतदान केंद्रांवर पहावयास मिळत आहे. नाशिक शहारात मतदार याद्यांमध्ये नावांचा घोळ, घरपोच मतदार चिठठया न मिळाल्याच्या तक्रारी असतानाही नाशिककर मोठ्या उत्साहाने ‘स्मार्ट’ पध्दतीने वोटर हेल्पलाईनचा वापर करत मतदार ओळखपत्राच्या क्रमांकावरून यादी भाग व अनुक्रमांक शोधत बुथ चा नाव पत्ताही माहिती करून घेताना दिसून येत आहे. यामुळे मतदान केंद्रात पोहचून नागरिक आपले मतदार ओळखपत्र दाखवत यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक सांगून मतदानाचा हक्क बजावत आहेत. मतदान जनजागृतीचा प्रभाव दिसून येत असून नोकरी, व्यवसायानिमित्त परदेशात राहणाऱ्या भारतीय नाशिककर नागरिक ांनीसुध्दा मतदानासाठी मुळ गावी येऊन सकाळी मतदान केले. सेंट फ्रान्सिस्को, जर्मनी येथून शहरात दाखल होत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
चेतनानगरमधील रहिवासी असलेले मिलींद फुलसे हे मागील काही वर्षांपासून नोकरीनिमित्त जर्मनी येथे वास्तव्यास आहे. त्यांच्या पत्नी वैशाली फुलसे यादेखील त्यांच्यासोबतच राहतात. त्यांनी येथील जाजू विद्यालयात सकाळी हजेरी लावून आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडले. यावेळी ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आनंद व्यक्त करत मतदाराचा हक्क बजावल्याचा मनापासून आनंद होत असल्याचे सांगितले. २९ एप्रिल रोजी नाशिक लोकसभा मतदार संघात मतदान होणार असल्याचे माहिती मिळताच तसे नियोजन सुरू करून पत्नीसह शुक्रवारी इंदिरानगरमध्ये दाखल झालो. उत्सुकता खूप होती. सकाळी पत्नी वैशालीला घेऊन मतदान केंद्रात पोहचलो अन् लोकशाहीने दिलेला अधिकार गाजवून आलो, अशा भावना मिलिंद यांनी बोलून दाखविल्या. मतदान हा प्रत्येकाचा अधिकार तर आहेच, मात्र क र्तव्यदेखील आहे, हे विसरून चालणार नाही. देशाला बळकट करण्यासाठी मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे वैशाली यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Demand Due to Democracy Right from Germany

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.