सुकेणे मार्गावर दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 11:52 PM2018-08-12T23:52:51+5:302018-08-13T00:30:16+5:30

कोकणगाव ते कसबे सुकेणे मार्गावर मोटारसायकलस्वाराला अज्ञात वाहनाने कट मारल्यामुळे तोल जाऊन चालकास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

Bike ride on the dry road | सुकेणे मार्गावर दुचाकीस्वाराचा मृत्यू

सुकेणे मार्गावर दुचाकीस्वाराचा मृत्यू

Next

ओझर टाउनशिप : कोकणगाव ते कसबे सुकेणे मार्गावर मोटारसायकलस्वाराला अज्ञात वाहनाने कट मारल्यामुळे तोल जाऊन चालकास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
रविवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास बाळासाहेब महादू गायकवाड (४५) राहाणार बेघरवस्ती रेल्वेस्टेशन कसबे सुकेणे हे त्यांच्या मोटारसायकलने (एम एच १५ व्हीडी १९४१) कसबे सुकेणे कडून कोकणगावकडे जात असतांना या रस्त्यावरील चारी जवळील हॉटेल आमराईसमोर अज्ञात वाहनाने मोटारसायकलला कट मारल्यामुळे गायकवाड यांचा तोल जाऊन ते मोटारसायकलसह रस्त्यावर पडले व गंभीर जखमी झाले. त्यांना रूग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला़

Web Title: Bike ride on the dry road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.