माणिक चौकात जीर्ण झाडाच्या फांद्या तुटल्याने वाहतूकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 01:07 PM2019-07-16T13:07:42+5:302019-07-16T13:07:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील माणिक चौकात 100 वर्ष वयाच्या झाडाच्या फांद्या तुटून पडल्या़ फांद्या थेट येथे उभ्या ...

Due to the collapse of broken tree branches in Manik Chowk, traffic restriction | माणिक चौकात जीर्ण झाडाच्या फांद्या तुटल्याने वाहतूकीची कोंडी

माणिक चौकात जीर्ण झाडाच्या फांद्या तुटल्याने वाहतूकीची कोंडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील माणिक चौकात 100 वर्ष वयाच्या झाडाच्या फांद्या तुटून पडल्या़ फांद्या थेट येथे उभ्या असलेल्या मोटारसायकलवर कोसळून नुकसान झाल़े घटनेत पावसामुळे इमारतीलगत आसरा घेणारा दाम्पत्य व त्यांचा मुलगा थोडक्यात बचावल़े 
सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शहरात पावसाच्या सरी कोसळल्या दरम्यान हवेचा काहीसा जोर होता़ यात माणिक चौक ते गणपती मंदिर रस्त्यावरील डॉ़ वडाळकर यांच्या दवाखान्याला लागून असलेल्या पिंपळाच्या झाडाच्या दोन मोठय़ा फांद्या तुटून थेट रस्तावर पडल्या़ पाऊस सुरु असल्याने रस्त्यावर वाहतूक सुरु नव्हती़ परंतू यावेळी पावसापासून बचाव व्हावा म्हणून नेहरु नगरातील दौलतसिंग गिरासे, अनिता गिरासे व त्यांचा मुलगा संदीप गिरासे हे इमारतीच्या भिंतीलगत थांबले होत़े फांदी थेट गिरासे यांची एमएच 39-एई-7862 या दुचाकीवर कोसळल्याने तिचे नुकसान झाल़े झाड कोसळल्याने मार्गावरील वाहतूक सुमारे दीड तासासाठी ठप्प झाली होती़ चौकातून गणपती मंदिराकडे येण्यासाठी रस्ताच वाहतूक पर्यायी मार्गाने सुरु झाली़ परंतू चारचाकी वाहनांना निघण्यासाठी जागा मिळत नसल्याने कोंडी वाढली होती़ यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर लामगे, देवीदास पाटील यांनी तातडीने येथे भेट देत वाहतूकीवर नियंत्रण मिळवल़े
 पालिकेच्या पथकाने येथे भेट देत रस्त्यावर पडलेले झाड कापून काढत वाहतूक सुरळीत केली़  100 वर्ष वयाचे पिंपळाचे झाड पूर्णपणे जीर्ण झाले असल्याने त्याच्या फांद्या आणखी कोसळण्याची भिती असल्याने पालिकेने याठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी आह़े 

Web Title: Due to the collapse of broken tree branches in Manik Chowk, traffic restriction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.