काव्य वाचनात 24 विद्यार्थिनींचा सहभाग : शहादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:19 PM2018-02-15T12:19:10+5:302018-02-15T12:19:14+5:30

24 students participate in poetry reading: Shahada | काव्य वाचनात 24 विद्यार्थिनींचा सहभाग : शहादा

काव्य वाचनात 24 विद्यार्थिनींचा सहभाग : शहादा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहादा येथील सिनीअर आर्टस महिला महाविद्यालयात ‘वसंत कोकीळ’ काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली़ यात, 24 विद्यार्थिनींनी व 5 प्राध्यापकांनी काव्यवाचनात सहभाग घेतला़ महाविद्यालयाच्या मराठी विभागाअंतर्गत ही काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली़
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य मंगला चौधरी, प्रमुख पाहुणे एस़पी़ पाटील, विद्यार्थिनी ज्योती वाडीले यांनी सरस्वतीपूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात केली़ 
काव्यवाचन स्पर्धेत वृषाली शिरसाठ, शुभांगी महिदे यांचा अनुक्रमे प्रथम व व्दितीय क्रमांक मिळवला़ समता लोहार व  शितल चित्ते या विद्यार्थिनींचा तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला़ 
या वेळी संस्थेचे चेअरमन तात्यासाहेब पाटील, उपाध्यक्ष हिरालाल पाटील, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य मंगला चौधरी, महाविद्यालयाचे समन्वयक एस़पी़ पाटील यांनी कार्यक्रमात सहभागी विद्यार्थिनींचा गौरव केला़
 

Web Title: 24 students participate in poetry reading: Shahada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.