येलो फिव्हर लसीकरणाची प्रतीक्षाच : डागा रुग्णालयात होणार होते केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 09:20 PM2019-12-07T21:20:29+5:302019-12-07T21:22:19+5:30

केनिया किंवा दक्षिण अमेरिकेतील काही देशांमध्ये जाणाऱ्यांना ‘येलो फिव्हरची लागण होऊ नये म्हणून नागपूरच्या डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात ‘येलो फिव्हर’ लसीकरण केंद्राला दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली.

Waiting for Yellow Fever Vaccine: Daga to be held as center | येलो फिव्हर लसीकरणाची प्रतीक्षाच : डागा रुग्णालयात होणार होते केंद्र

येलो फिव्हर लसीकरणाची प्रतीक्षाच : डागा रुग्णालयात होणार होते केंद्र

Next
ठळक मुद्देप्रवाशांना गाठावी लागत आहे मुंबई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केनिया किंवा दक्षिण अमेरिकेतील काही देशांमध्ये जाणाऱ्यांना ‘येलो फिव्हरची लागण होऊ नये म्हणून नागपूरच्या डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात ‘येलो फिव्हर’ लसीकरण केंद्राला दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. दरम्यानच्या काळात एका आरोग्य अधिकाऱ्यासह परिचारिका, फार्मसिस्ट व कर्मचाऱ्याला याबाबत प्रशिक्षण दिले. परंतु त्यांची बदली झाल्याने आता मुंबई येथील केंद्रीय आरोग्य विभाग प्रशिक्षित कर्मचारी नसल्याचे कारण देऊन परवानगी नाकारली आहे. परिणामी, या लसीसाठी मध्य भारतातील लोकांना मुंबई गाठावी लागत आहे.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रत्येक भारतीयाला आफ्रिकन देशात जाण्यापूर्वी ‘येलो फिव्हर' लस टोचली जाते. आंतरराष्ट्रीय व्हिजा नियमांतर्गत ही लस टोचून घेणे बंधनकारक आहे. सध्या आफ्रिकन देशात जाण्यास इच्छुक असलेल्या प्रवाशांना लस टोचण्यासाठी राज्यात आरोग्य विभागाची मुंबई व पुण्यातच सोय आहे. नागपुरात एका खासगी इस्पितळाला याची परवानगी दिली आहे. परंतु येथे लसीचा तुटवडा, तसेच पाच ते १५ हजारापर्यंत मोठी किंमतही चुकवावी लागत असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत.

रुग्णालय प्रशासनाकडून पाठपुरावाच नाही
नागपूरच्या शासकीय सेवेत हे लसीकरण केंद्र सुरू झाल्यास मध्य भारतातील नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार होता. शिवाय मुंबईच्या केंद्रात होणारी गर्दी कमी होणार होती. ही बाब लक्षात घेत २०१६ मध्ये आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी या संदर्भात प्रस्ताव पाठविला. त्याला मंजुरी मिळाली. डागा रुग्णालयात हे केंद्र स्थापित होणार होते. त्या अनुषंगाने तत्कालीन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तत्कालिन सचिव व संचालक यांनी डागाला भेट दिली. लसीकरण केंद्राच्या प्रस्तावित जागेची पाहणी केली. एक वैद्यकीय अधिकाऱ्यासह पाच जणांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. परंतु प्रशिक्षण प्राप्त करून येताच वैद्यकीय अधिकाऱ्याची बदल्या झाल्या. यामुळे दुसºया वैद्यकीय अधिकाऱ्याला प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा प्रस्ताव मुंबई येथील केंद्रीय आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला. मात्र डागा प्रशासनाने याचा पाठपुरवा केला नसल्याने अद्यापही हे केंद्र कागदावरच आहे.

मेडिकलनेही पाठविला होता प्रस्ताव
दोन वर्षांपूर्वी नागपूर मेडिकलच्या जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाकडून येलो फिव्हर लसीकरण केंद्राचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला होता. परंतु अद्यापही याला मंजुरी मिळाली नाही. विशेष म्हणजे, यासाठी अधिकृत अधिकारी म्हणून डॉ. अविनाश गावंडे व डॉ. समीर गोलावार यांची नेमणूक करण्यात आली होती.

Web Title: Waiting for Yellow Fever Vaccine: Daga to be held as center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.