कृत्रिम दरवाढ व भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करा : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 10:44 PM2021-07-30T22:44:30+5:302021-07-30T22:45:01+5:30

strict action against artificial price hike and adulteration शासनाच्या निर्बंधाचा गैरफायदा घेऊन कोरोना काळात जीवनावश्यक वस्तूंमध्ये भेसळ होत असेल व अनावश्यक दरांमध्ये वस्तूंची विक्री होत असेल, तर यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी शुक्रवारी दिले.

Take strict action against those who commit artificial price hike and adulteration: District Collector's instructions | कृत्रिम दरवाढ व भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करा : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

कृत्रिम दरवाढ व भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करा : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शासनाच्या निर्बंधाचा गैरफायदा घेऊन कोरोना काळात जीवनावश्यक वस्तूंमध्ये भेसळ होत असेल व अनावश्यक दरांमध्ये वस्तूंची विक्री होत असेल, तर यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी शुक्रवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत वजनमापे तसेच अन्न व औषध विभागाने याकडे लक्ष वेधावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोना संसर्ग काळामध्ये जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. यावेळी अनेक सदस्यांनी कोरोना संसर्ग काळामध्ये मर्यादित वेळेत ग्राहकांना सामान खरेदी करायचे असल्यामुळे मनमानी दरवाढ व भेसळ केलेले पदार्थ विक्री केले जात असल्याचे ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी लक्षात आणून दिले. यावेळी उपस्थित वैधमापन विभाग व अन्न औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात त्यांनी निर्देश दिले. तसेच नागरिकांनी अशा समस्यांची लेखी तक्रार, संबंधित विभागाकडे करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसात तेलामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे यासंदर्भात करण्यात आलेल्या कार्यवाहीचे अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. परिषदेच्या सदस्यांनी या काळामध्ये जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला तसेच खाद्यपदार्थ चढ्या भावाने विकल्या जात असल्याबाबत तक्रारी केल्या. कृत्रिम महागाई कोरोना काळात वाढत असल्याचे लक्षात आणून दिले. तसेच ग्राहक संरक्षण समितीच्या बैठका प्रत्यक्ष व्हाव्यात, सर्वांना ओळख पत्र मिळावेत, अशी विनंती देखील केली.

या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, पोलीस उपअधीक्षक संजय पुरंदरे, वजनमापे विभागाचे बानाफर, अन्न व औषधी विभागाचे डॉ. पी. एम. बल्लाळ, सदस्य शामकांत पात्रीकर, रेखा भोंगाळे, मनोहर रडके, अर्चना पांडे, गणेश इनाके, रवीकांत गौतमी, कमल नामपल्लीवार, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी मृदुला मोरे उपस्थित होते.

जुन्या व एक्सपायरी डेटच्या वस्तू विकू नये

कोविड प्रोटोकॉल पुढील काही दिवसात शिथिल होण्याची शक्यता आहे. अशावेळी निर्बंध घातलेली दुकाने, मॉल उघडण्यात येतील, यावेळी संग्रही असणाऱ्या पदार्थांची विक्री होणार नाही. या संदर्भात काळजी घ्यावी. तसेच दुकानदारांनी देखील अपायकारक ठरतील (एक्सपायरी डेट) आदी वस्तूंची विक्री करू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

Web Title: Take strict action against those who commit artificial price hike and adulteration: District Collector's instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.