राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आता ‘बायोमेट्रिक’ हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 08:54 PM2017-12-21T20:54:51+5:302017-12-21T20:55:18+5:30

विद्यार्थी नियमितपणे महाविद्यालांमध्ये यावेत यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ‘बायोमेट्रिक’ हजेरी अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

Students of junior colleges in the state now receive 'biometric' attendance | राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आता ‘बायोमेट्रिक’ हजेरी

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आता ‘बायोमेट्रिक’ हजेरी

Next
ठळक मुद्देबाहेर जाता येता हजेरी बंधनकारक

आॅनलाईन लोकमत
नागपूर : राज्यात खासगी शिकवणी वर्गांचे पीक आले असून कनिष्ठ महाविद्यालयांसोबत हातमिळवणी करून ‘इंडिग्रेटेड’ क्लासेस चालविण्यात येतात. यावर नियंत्रण यावे व विद्यार्थी नियमितपणे महाविद्यालांमध्ये यावेत यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ‘बायोमेट्रिक’ हजेरी अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. राज्यातील अनधिकृत खासगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्याबाबत डॉ.अपूर्व हिरे, नागो गाणार आदी सदस्यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश करताना व बाहेर जाताना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात येणार असून अशा ‘इंटिग्रेडेड’ क्लासेस व संलग्न कनिष्ठ महाविद्यालयाची यादी मार्चपर्यंत जाहीर करण्यात येईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले. खासगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी अधिनियम तयार करण्याच्या अनुषंगाने विधेयकाच्या मसुद्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीमार्फत विधेयकाचा मसुदा तयार करण्याची कार्यवाही सुरू असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

Web Title: Students of junior colleges in the state now receive 'biometric' attendance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.