नागपूर जिल्ह्यात प्रेमप्रकरणातून विवाहितेची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 09:09 PM2019-05-27T21:09:14+5:302019-05-27T21:13:32+5:30

अविवाहित तरुणाने घराशेजारी राहणाऱ्या विवाहितेला लग्न करण्याची बतावणी करून तिच्याशी आधी प्रेम आणि नंतर शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यातच गाव सोडून बाहेर एकत्र राहण्याचे नाटकही केले. मात्र, त्यांच्या संबंधात दुरावा निर्माण झाला आणि त्याने तिला गावाला परत आणून मित्रांच्या मदतीने तिचा खून केला. एवढेच नव्हे तर, तिने आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण करीत त्याने पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह शेतात पुरून परस्पर विल्हेवाट लावली. ही खळबळजनक घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांद (मानकापूर) येथे रविवारी (दि. २६) रात्री उशिरा उघडकीस आली.

Marriage woman murdered in a love affair in Nagpur district | नागपूर जिल्ह्यात प्रेमप्रकरणातून विवाहितेची हत्या

नागपूर जिल्ह्यात प्रेमप्रकरणातून विवाहितेची हत्या

Next
ठळक मुद्देतिघांना अटक : आत्महत्येचा देखावा करून मृतदेहाची विल्हेवाटभिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांद (मानकापूर) येथील थरार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (नांद ) : अविवाहित तरुणाने घराशेजारी राहणाऱ्या विवाहितेला लग्न करण्याची बतावणी करून तिच्याशी आधी प्रेम आणि नंतर शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यातच गाव सोडून बाहेर एकत्र राहण्याचे नाटकही केले. मात्र, त्यांच्या संबंधात दुरावा निर्माण झाला आणि त्याने तिला गावाला परत आणून मित्रांच्या मदतीने तिचा खून केला. एवढेच नव्हे तर, तिने आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण करीत त्याने पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह शेतात पुरून परस्पर विल्हेवाट लावली. ही खळबळजनक घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांद (मानकापूर) येथे रविवारी (दि. २६) रात्री उशिरा उघडकीस आली.
उर्मिला गजानन धारणे (४०) असे मृत महिलेचे तर रोशन बाबा देवके (२४), सचिन नत्थू घरत (३०) व सुनील अर्जुन ढोणे (२७) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. हे चौघेही नांद (ता. भिवापूर) येथील रहिवासी आहेत. उर्मिला व रोशन शेजारी असून, त्यांचे दोन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. विशेष म्हणजे, रोशन अविवाहित आहे. त्यांच्या प्रेमप्रकरणाची गावभर चर्चा असल्याने दोघांच्याही घरी भांडणे व्हायची. त्यामुळे दोघेही तीन महिन्यांपूर्वी पळून गेले होते. नंतर त्यांच्यात पोलिसांसमक्ष समझोता होऊन दोघेही बाहेरगावी राहायला गेले. रोशन महिनाभरापूर्वी एकटाच गावात राहायला आला व लग्नासाठी मुली बघायला लागला.
दुसरीकडे, ती नागपूर येथे धुणीभांडी करू लागली. पण, तिच्याबाबत कुणाला काहीही माहिती नव्हते. काही दिवसांपूर्वी त्याने तिला कोरा (ता. समुद्रपूर, जिल्हा वर्धा) येथे त्याच्या मावसभावाच्या घरी भेटायला बोलावले. त्यानंतर नातेवाईकांनी दोघांनाही परत नांदला आणले, मात्र, त्याच्या कुटुंबीयांच्या विरोधामुळे दोघेही कारा येथे परत गेले. चार दिवसांपूर्वी दोघेही नांद येथे आले आणि त्यांनी गावालगतच्या देवके यांच्या शेतातील घराच्या स्लॅबवर रात्र काढली. दुसºया दिवशी त्या घराच्या मागे असलेल्या वडाच्या झाडाला लाल साडी परिधान केलेली महिला आढळून आल्याचे स्थानिक गुराख्याने नागरिकांना सांगितले आणि गावात चर्चेला उधाण आले. प्रत्यक्ष पाहणीत तिथे मृतदेह नसल्याने तसेच झाडाखाली चपला व लाल बांगड्यांचे तुकडे आढळून आल्याने संशय बळावला. मात्र, झाडाच्या फांदीला फासाचे निशाण नव्हते.
रोशनचा मात्र गावात मुक्त संचार सुरू होता. तिच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविताच पोलिसांनी तपासाला वेग दिला. सोमवारी (दि. २७) दुपारी उपविभागीय पोलीस अधिकारी (प्रभारी) राजेंद्र चव्हाण, तहसीलदार साहेबराव राठोड, ठाणेदार (प्रभारी) सुधाकर आंभारे, उपनिरीक्षक किशोर धोपाडे, राजेंद्र डहाके, नागेश वागाडे, नरेश बाटबराई, श्रीचंद पवार यांच्या उपस्थितीत मृतदेह जमिनीतून बाहेर काढण्यात आला. शिवाय, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती जाणून घेतली. याप्रकरणी भिवापूर पोलिसांनी भादंवि ३०२, २०१, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
चपला ठरल्या महत्त्वाचा पुरावा
काही ग्रामस्थांना रोशन व उर्मिला सिर्सीहून नांद येथे येत असल्याचे बघितले होते. झाडाजवळ आढळून आलेल्या चपला नेमक्या कुणाच्या आहेत, हे तपासण्यासाठी पोलिसांनी रोशनला बोलावून विचारपूस केली. सुरुवातीला त्याने तिच्याशी दोन महिन्यांपासून संपर्क नसल्याचे सांगून उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. त्यातच तो खोटा बोलत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्याला कोरा येथे नेले. तिथे एका महिलेने त्या चपला उर्मिलाच्या असल्याचे सांगितल्याने रोशनची फसगत झाली.
अन् गूढ उकलले
पोलीस त्यांच्या मूळ पदावर येताच रोशनने गुन्ह्याची कबुली दिली. शेवटची रात्र एकत्र काढल्यानंतर तिने आत्महत्या केली असून, आपल्यावर आळ येऊ नये म्हणून आपण तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. त्यासाठी शेतात खड्डा खोदला आणि मृतदेह खड्ड्यापर्यंत नेण्यासाठी बैलगाडीचा वापर केला. ही सर्व कामे एकट्याने कमी वेळात करणे शक्य नसल्याने त्याने सचिन व सुनीलची मदत घेतली. प्रथमदर्शनी पुरावे लक्षात घेता, तिची आत्महत्या नसून खून असल्याची गावात चर्चा होती.

Web Title: Marriage woman murdered in a love affair in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.