महामेट्रो देशात पहिल्या क्रमांकाकडे अग्रसेर

By मोरेश्वर मानापुरे | Published: May 2, 2024 05:22 PM2024-05-02T17:22:52+5:302024-05-02T17:24:13+5:30

Nagpur : मेट्रो भवनात महाराष्ट्र दिवस

Mahametro is moving towards number one in the country | महामेट्रो देशात पहिल्या क्रमांकाकडे अग्रसेर

Maha Metro

नागपूर : देशाच्या पायाभूत विकासामध्ये महामेट्रो प्रतिनिधित्व करीत असून ही आमच्यासाठी कौतुकास्पद आणि अभिमानाची बाब आहे. महामेट्रो देशात पहिल्या क्रमांकाकडे अग्रसेर असल्याचे प्रतिपादन महामेट्रोचे संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) अनिल कोकाटे यांनी व्यक्त केले. मेट्रो भवनात ६४ वा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. महामेट्रोने कमी वेळेत अनेक कार्य पूर्ण केले आहे.

सर्वच बांधकामात कामगारांचा सहभाग आहे. त्यांनी सर्वांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महामेट्रो नागपूर, पुणे आणि नवी मुंबई येथील प्रकल्पाचे संचालन करीत आहे. व्यवस्थापकीय संचालकांच्या नेतृत्वात निरंतर प्रगती करीत आहे. महाराष्ट्र देशाच्या प्रगतीत निश्चितच उच्चांक गाठेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी महामेट्रोचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Mahametro is moving towards number one in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.