देशातील रोजगार वाढविण्यासाठी पंतप्रधानांनी दिले सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:22 AM2019-06-01T11:22:16+5:302019-06-01T15:35:54+5:30

देशातील रोजगार वाढावा व बेरोजगारीची समस्या सुटावी या हेतूनेच पंतप्रधानांनी आपल्यावर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपविली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

To enhance employment in the country, the Prime Minister gave Ministry of Micro, Small and Medium Enterprises | देशातील रोजगार वाढविण्यासाठी पंतप्रधानांनी दिले सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय

देशातील रोजगार वाढविण्यासाठी पंतप्रधानांनी दिले सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: देशातील रोजगार वाढावा व बेरोजगारीची समस्या सुटावी या हेतूनेच पंतप्रधानांनी आपल्यावर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपविली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे नागपुरात शनिवारी सकाळी प्रथमच आगमन झाले तेव्हा ते पत्रकारांसोबत बोलत होते.
एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले, रोजगारनिर्मिती करण्याची ही मला मिळालेली उत्तम संधी आहे असे मी मानतो. देशात महामार्गाच्या कडेला १२५ कोटी झाडे लावणार आहे. गंगा शुद्धीकरण संदर्भात अनेक कामे झाली आहेत. मंत्रिमंडळात असलेले नवीन मंत्री ही कामे समोर घेऊन जातील. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.

Web Title: To enhance employment in the country, the Prime Minister gave Ministry of Micro, Small and Medium Enterprises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.