तोकडे कपडे घातलेल्या ‘डान्सर्स’वर ‘सिनेस्टाइल’ पैशांची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2023 08:00 AM2023-07-11T08:00:00+5:302023-07-11T08:00:07+5:30

Nagpur News ‘लि मेरिडियन’ हॉटेलमधील एका कॉर्पोरेट कार्यक्रमात चक्क ‘सिनेस्टाइल’ नाच झाला व डान्सर्स तरुणींवर अक्षरशः पैसे फेकत उधळण्यात आले.

A 'Cinestyle' splash of money on 'Dancers' dressed to the hilt | तोकडे कपडे घातलेल्या ‘डान्सर्स’वर ‘सिनेस्टाइल’ पैशांची उधळण

तोकडे कपडे घातलेल्या ‘डान्सर्स’वर ‘सिनेस्टाइल’ पैशांची उधळण

googlenewsNext

विराज देशपांडे

नागपूर : नागपूर पोलिस आयुक्तांनी हॉटेल्समध्ये आयोजित कार्यक्रमांबाबत स्पष्ट दिशानिर्देश जारी केल्यावरदेखील त्याचे उघडपणे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. ‘लि मेरिडियन’ हॉटेलमधील एका कॉर्पोरेट कार्यक्रमात चक्क ‘सिनेस्टाइल’ नाच झाला व डान्सर्स तरुणींवर अक्षरशः पैसे फेकत उधळण्यात आले. एखाद्या बी ग्रेड चित्रपटाप्रमाणे चाललेला नाच व फेकले जाणारे पैसे याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर खळबळ उडाली आहे.

‘लोकमत टाइम्स’जवळ आलेल्या या व्हिडीओत वर्धा रोडवरील हॉटेल ले मेरिडियन येथे झालेल्या कार्यक्रमातील तोकडे कपडे घातलेल्या तरुणी डान्स फ्लोअरवर नाच करत होत्या व तेथे उपस्थित असलेल्या काही अतिउत्साही मंडळांनी ‘सिनेस्टाइल’ पद्धतीने पैसे ओवाळत मुलींवर ते उधळले.

सोमवारी याबाबत व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे कामगिरीची बातमी स्थानिक व्यापारी मंडळींपर्यंत पोहोचली. हा कार्यक्रम एका मोठ्या सोलर इन्स्ट्रुमेंट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने आयोजित केलेल्या डीलर्स मेळाव्याचा भाग होता. या कार्यक्रमात शहरातील अनेकांनी सहभाग घेतला होता. नियमित बैठकीनंतर, सुमारे ८ ते १० तरुणींचे नृत्य सादरीकरण केले गेले. त्यात हा प्रकार घडला. शहरात अशा प्रकारचे नृत्य आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा घटना शहराच्या हद्दीबाहेर रिसॉर्ट्समध्ये घडल्या आहेत आणि त्यात सहभागी झालेले बहुसंख्य समाजकंटक होते. लोकमत टाइम्सने लि मेरिडियनचे ऑपरेशन्स मॅनेजर जितेंद्र शर्मा यांना विचारणा केली असता त्यांनी काहीही वेगळे किंवा अयोग्य घडले नसल्याचे स्पष्ट केले. हॉटेलकडे सर्व आवश्यक परवानग्या होत्या. लग्नाचा कार्यक्रम किंवा कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये नृत्य नेहमीच घडते. आमच्याकडे सर्व आवश्यक परवानग्या आणि परवाने आहेत, असे त्यांनी सांगितले.

Web Title: A 'Cinestyle' splash of money on 'Dancers' dressed to the hilt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.