Raj Thackeray: अजित पवारांना भेटलो, अशोक चव्हाणांशी बोललो, पण...; राज ठाकरेंनी सांगितली 'राज की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 07:26 PM2019-03-19T19:26:36+5:302019-03-19T20:05:41+5:30

गेले कित्येक दिवसांत मी पत्रकारांना भेटलोच नाही. पण तरीही लोकसभेच्या दोन जागा, तीन जागा मागितल्याच्या बातम्या देत होते.

Raj Thackeray: Meet Ajit Pawar, talked with Ashok Chavan, but ...; Raj Thackeray told 'Raj ki baat' | Raj Thackeray: अजित पवारांना भेटलो, अशोक चव्हाणांशी बोललो, पण...; राज ठाकरेंनी सांगितली 'राज की बात'

Raj Thackeray: अजित पवारांना भेटलो, अशोक चव्हाणांशी बोललो, पण...; राज ठाकरेंनी सांगितली 'राज की बात'

Next

मुंबई : राज ठाकरे राष्ट्रवादीसोबत जाणार असल्याच्या अजित पवारांच्या वक्तव्यावर त्यांना फोन करून विचारले कुठे भेटुयात; भेटलो आणि जाब विचारला. तुम्हाला कधी भेटलो, पक्षाचा कोणता नेता बोलला का? कधी सीट मागितल्या का? नाही म्हणाले. यानंतर अशोक चव्हाणांनाही विचारले. जर नाही तर मग तुम्ही माध्यमांसमोर का बोलत सुटलात? असा जाब विचारल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. 

राज ठाकरे यांनी आज मुंबईमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांची रंगशारदा सभागृहामध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याच्या निर्णयावर खुलासा केला. तसेच गेल्या काही दिवसांत आलेल्या अफवांवरही भाष्य केले. गेले कित्येक दिवसांत मी पत्रकारांना भेटलोच नाही. पण तरीही लोकसभेच्या दोन जागा, तीन जागा मागितल्याच्या बातम्या देत होते. माझा पाडवा मेळावा आठवा, मी म्हणालो होतो देशातील सर्व पक्षांनी मोदी आणि शाह ह्यांच्या विरोधात एकत्र यायला हवं. मग मी का घाबरेन? काँग्रेस, राष्ट्रवादीकडून वक्तव्ये यायला सुरु झाली. कोणी म्हणते अवैध, कोणी म्हणे चुकीचे. शरद पवार भेटले. विमानतच भेटले. जमिनीवरच्या चर्चा हवेत करायच्या असतात का. औरंगाबादला गेलेलो, तेही तेथे होते. मागे येताना एकाच विमानात असल्याचे कळले. आता बोलायचे नाही का, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 


यावरून राष्ट्रवादीसोबत जाण्याची चर्चा. काँगेसचे नेते बोलले. मग अजित पवार बोलल्यावर मात्र त्यांना फोन केला, विचारले कुठे भेटता येईल. भेटलो. त्यांना विचारले मी कधी बोललो? आमच्यापैकी कोणी भेटला? तर नाही. मग पत्रकार काहीही गोष्टी विचारतात त्याची उत्तरे कशी देता असे विचारले. मी लोकसभा लढणार नाही हे आधीच सांगितले आहे. जो निर्णय घेईन तो तुमच्या फायद्याचा असेल, असे राज यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. 

Raj Thackeray: अजित पवारांना भेटलो, अशोक चव्हाणांशी बोललो, पण...; राज ठाकरेंनी सांगितली 'राज की बात'

ही निवडणूक मोदी आणि शहा यांच्या विरोधात देश अशी आहे. यापुढील सभा या केवळ यांच्या विरोधात असतील. आता काय चौकीदार, भारतातल्या निवडणूका लढवताय की नेपाळच्या, असा सवालही त्यांनी केला. पंतप्रधान एवढ्या खालच्या विचारांचा असेल असे वाटले नाही. काय तर म्हण चौकीदार, या भानगडीत पडू नका. ही मोहीम ट्रॅप आहे. गेल्या साडे चार वर्षातील अपयश झाकण्यासाठी हे सुरु केले आहे. सावध व्हा. 

कार्यकर्ते, मतदारांना आदेश

याच्या पुढची भाषणे करेन किंवा तुम्ही जे काही कराल ते भाजपाच्या विरोधात करायचे. हेच तुमचे पक्षासाठी योगदान असेल. देश एका मानसाच्या मोठ्या संकटामध्ये आहे. भाजपवाले थैल्या रिकाम्या करतील. केल्या तर घ्या, हीच त्यांना लुटायची वेळ आहे. त्यांनी गेली पाच वर्षे देश लुटला. ही निवडणूक पक्षाची नाही. भाजप पक्ष म्हणून अंतर्गत खूप त्रस्त आहे. ही दोन माणसे जेव्हा बाजुला होतील त्यानंतरची लढाई ही खरी पक्षांमधील असेल, असेही राज ठाकरे म्हणाले. 

 



 



 


Raj Thackeray: भाजपाच्या, मोदींच्या विरोधात काम करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

Web Title: Raj Thackeray: Meet Ajit Pawar, talked with Ashok Chavan, but ...; Raj Thackeray told 'Raj ki baat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.