भाजपाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री का केलं?; जयंत पाटील यांनी सांगितलं 'राज'कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 02:42 PM2022-07-01T14:42:41+5:302022-07-01T14:49:18+5:30

Jayant Patil And Eknath Shinde : राजभवनावरील छोटेखानी समारंभात शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाष्य़ केलं आहे.

Maharashtra Political Crisis Jayant Patil reaction over CM Eknath Shinde And Devendra Fadnavis | भाजपाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री का केलं?; जयंत पाटील यांनी सांगितलं 'राज'कारण

भाजपाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री का केलं?; जयंत पाटील यांनी सांगितलं 'राज'कारण

googlenewsNext

मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर गुरुवारी भाजपाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर लगेचच राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले. मात्र, राजभवनावर झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे नाव घोषित करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. शिंदे यांच्या गटाला भाजप पाठिंबा देईल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांच्या घोषणेनंतर भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारत नव्या सरकारात सहभागी होण्याचे आदेश दिले. या सर्व राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने घडल्या. 

अखेरीस सायंकाळी साडेसात वाजता राजभवनावरील छोटेखानी समारंभात शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी यावर भाष्य़ केलं आहे. भाजपाच्या या निर्णयामध्ये कुठलंही धक्कातंत्र दिसलं नाही. मात्र सत्ता मिळवण्यासाठी ज्यापद्धतीने प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये रोष निर्माण झाला होता. या रोषाला शांत करण्यासाठी भाजपाने हा निर्णय घेतला असावा असं वाटत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. 

"देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं. मात्र त्यांना वरून सूचना आली. भाजपामध्ये वरून आलेल्या आदेशाचे पालन करावे लागते. देवेंद्र फडणवीस यांना देखील आपणच मुख्यमंत्री होणार असं वाटत असावं मात्र वरिष्ठांच्या आदेशापुढे त्यांचा नाईलाज झाला. त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. याचे दु:ख त्यांनाही झाले असेलच असंही यावेळी जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

फडणवीस हे मोठ्या आणि उमद्या मनाचे राजकारणी आहेत. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. महाराष्ट्रात एक मजबूत सरकार दिसेल. बाळासाहेबांचे हिंदुत्व, मतदारसंघातील कामे आणि राज्याचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. मंत्रिपदासाठी किंवा कोणत्याही स्वार्थासाठी आम्ही एकत्र आलो नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
 

Web Title: Maharashtra Political Crisis Jayant Patil reaction over CM Eknath Shinde And Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.