सुनील तटकरेंसोबत गप्पांचा व्हिडीओ व्हायरल होताच जयंत पाटील म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 08:52 PM2023-07-24T20:52:51+5:302023-07-24T20:53:17+5:30

जयंत पाटील व सुनील तटकरे यांचा एक व्हिडीओ व काही फोटो व्हायरल झाल्याचे दिसले. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले.

Jayant Patil clarifies after video of chatting with Sunil Tatkare went viral NCP Sharad Pawar Ajit Pawar | सुनील तटकरेंसोबत गप्पांचा व्हिडीओ व्हायरल होताच जयंत पाटील म्हणाले...

सुनील तटकरेंसोबत गप्पांचा व्हिडीओ व्हायरल होताच जयंत पाटील म्हणाले...

googlenewsNext

Jayant Patil Sunil Tatkare Viral Video: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुनील तटकरे यांचा विधिमंडळाच्या लॉबीतील फोटो सोमवारी प्रचंड व्हायरल झाला. अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वैचारिक लढाई सुरू आहे. पण असे असले तरी अजित पवार गट शरद पवारांची मनधरणी करत असल्याचे प्रयत्न अनेकदा दिसले. इतकेच नव्हे तर जयंत पाटील यांना सत्तेत घेऊन मंत्रिपद देण्याचीही भाजपाची तयारी असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्याच दरम्यान, सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांचे काही फोटो व्हायरल झाले. त्यात ते हसत गप्पा मारत होते. यावर आपली भूमिका स्पष्ट करताना, जयंत पाटील यांनी महत्त्वाची विधाने केली.

"खासदार सुनील तटकरे वेगळ्या पक्षात आहेत मी वेगळ्या पक्षात आहे. विधीमंडळात आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून एकमेकांना भेटू शकतो. आमचे व्यक्तीगत संबंध असू शकतात. त्याचा राजकीय अर्थ काढण्याचे कोणतेच कारण नाही. माझे इतर पक्षातील अनेक नेत्यांशी चांगले संबंध आहे मात्र याचा वेगळा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. मी शरद पवार साहेबांसोबत ठाम आहे," असा जयंत पाटील यांनी पुनरुच्चार केला.

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत ठाम आहे. पवार साहेब सांगतील तीच आमची दिशा आहे असे त्यांनी स्पष्ट केले. आता अजित पवारांसोबत गेलेले ६ आमदार हे माझ्या सोबत लॉबीत बसलेले होते. ३ आमदारांनी माझ्या सोबत जेवण केले. याचा अर्थ काही वेगळा होत नाही. त्यामुळे कोणीही गैरसमज निर्माण करु नका," असेही पाटील यांनी सांगितले. 

या दरम्यान, निधी वाटपात दुजाभाव झाल्याचे वृत काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते यावर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांच्या मतदारसंघात निधी वाटप झालेला दिसत आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा शहरी मतदारसंघ आहे त्यामुळे नगरविकास खात्यामार्फत त्यांना निधी मिळू शकतो.

Web Title: Jayant Patil clarifies after video of chatting with Sunil Tatkare went viral NCP Sharad Pawar Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.